‘व्हिजिबल मी’मुळे समलैंगिकांना आवाज आणि आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2016 12:54 PM
स्वत:च्या लैंगिकतेबद्दल खुल्या मनाने व्यक्त होणासाठी व्हिजिबल मी (#VisibleMe) ही कॅम्पेन सध्या इंटरनेटवर जोरात चालू आहे.
समलैंगिक असणे गुन्हा किंवा आजार नाही. परंतु समाजात आजही समलैंगिक लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकोचित आहे. त्यामुळे कित्येक समलैंगिक लोक आजन्म कुंथत जगतात.मनमोकळेपणाने ते समाजात वावारत नाही. सतत भीतीखाली राहताना त्यांच्या मनाची होणारी ओढताण असहय्य करणारी असते. प्रसिद्ध फोटोशेअरिंग बेबासाईट इन्स्टाग्रामने यासंदर्भात अभिनव उपक्रम सुरू केला आहे.एलजीबीटीक्यू समुदयातील तरुण-तरुणांना समोर येऊन स्वत:च्या लैंगिकतेबद्दल खुल्या मनाने व्यक्त होणासाठी 'व्हिजिबल मी' (#VisibleMe) ही कॅम्पेन सध्या इंटरनेटवर जोरात चालू आहे.प्रसिद्ध स्नॅपचॅटर थॉमस मूर अणि यूट्यूब सिलेब्रिटी ब्रेंडन जार्डन हे या मोहिमेशी जोडले गेलेले आहेत. ली ज्युलिएट या १९ वर्षीय युवतीने ‘व्हिजिबल मी’मध्ये सहभाग घेत तिची काहणी सर्वांशी शेअर केली. ती म्हणते, या मोहिमेमुळे समाजात दबुन राहिलेला एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांच्या घुसमटीला वाट मिळेल. आपले अस्तित्व मान्य करून सन्माने जगण्यासाठी खुलेपणाने बोलणे गरजेचे आहे.