तुम्हालाही कधी असं वाटतं का की, तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहिलं नाहीये? काय जुन्या गोष्टी आठवून आठवून तुम्ही त्रास करुन घेता? या सर्व गोष्टींमुळे तुमचं कामात लक्ष लागत नाही? अशा स्थितीत काय करावं याबाबत एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे. अशा स्थितीत सर्वातआधी विचार करण्याची पद्धत बदलण्याची गरज असल्याचं या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या पार्टनरबाबत पॉझिटीव्ह असतो, तेव्हा त्याला या हताशपणातून बाहेर येण्यास फार मदत मिळते. असे लोक आपलं नातं फारच सहजपणे सांभाळतात. सकारात्मक विचार पार्टनरच्या जवळ घेऊन जाण्यास मदत करतो आणि यामुळे दोघांचाही एकमेकांप्रति विश्वास वाढतो. नकारात्मक विचार नेमका याच्या उलट प्रभाव करतो.
तज्ज्ञांनुसार, सकारात्मक विचार पार्टनरबाबत प्रेम आणि जवळीकता वाढवण्यास फायदेशीर ठरतो. कारण सकारात्मक विचाराने दोघेही एकमेकांमधील चांगल्या गोष्टी जाणू घेऊ शकतात. तेच जर त्यांनी नकारात्मक विचार केला तर ते केवळ एकमेकांमधील वाईट गोष्टीच शोधत राहतात.
या रिसर्चसाठी अभ्यासकांनी ४० लोकांना यात सहभागी करुन घेतले होते. त्यांना त्यांच्या सद्याच्या जोडीदाराचे आणि एक्सचे फोटो दाखवण्यात आले. त्यांना सांगण्यात आलं की, या फोटोंकडे सकारात्मक विचाराने बघा. तसेच त्यांच्या नात्याला आणि भविष्यालाही वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्यास सांगण्यात आलं.
त्यानंतर त्यांना हेच फोटो नकारात्मक विचाराने बघायला सांगण्यात आलं. त्यानंतर या रिसर्चमधून हे आढळलं की, सकारात्मक विचार करतेवेळी त्यांचे मेंदू मजबूत होते आणि नकारात्मक विचार करताना कमजोर होते.
हे असं असलं तरी PLOS नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी याच्या उलट करण्यास सांगण्यात आलं आहे. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी नकारात्मक गोष्टींवर फोकस करायला हवं.