प्रत्येक मुलीची इच्छा असते की, ती सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळी दिसावी. काही मुलींना वाटत असतं की, मुलांचं अटेंशन त्यांना मिळावं. या नादात अनेक मुली ब्यूटी प्रॉडक्ट्स, ट्रीटमेंट्स आणि नव्या ड्रेसेसच्या फंद्यात पडतात. मात्र, ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो ती गोष्ट करण्यात काहीच गैर नाही. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, मुलांना तुमच्यातील कोणत्या गोष्टी जास्त आवडतात. नसेल माहीत तर जाणून घेऊ पहिल्या भेटीत मुलींच्या कोणत्या गोष्टींकडे मुलं होतात आकर्षित.
डोळे
मुलांची पहिली नजर मुलींच्या डोळ्यांवर पडते. दोन लोकांच्या संवादाची सुरुवातच सर्वातआधी डोळ्यांनी होते. एखाद्याच्या डोळ्यात बघून व्यक्तीबाबत खूपकाही जाणून घेता येतं, असं म्हटलं जातं. त्यामुळेच मुलांची नजर मुलींच्या डोळ्यांकडे असते. मुलींच्या डोळ्यांकडे बघूनच मुलं त्यांच्या व्यवहार आणि व्यक्तिमत्वाबाबत जाणून घेत असतात. तसेच ते जे शब्दांमधून बोलता येत नाही ते डोळे सांगून जातात. त्यामुळे मुलं मुलींच्या डोळ्यात बघतात.
मुलींची स्माईल
मुलींची स्माईल बघूनच मुलांचं मन आनंदी होतं. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी मुलींची स्माईलच पुरेशी ठरते. एखाद्या अनोळकी व्यक्तीलाही तुम्ही स्माईल करत भेटता तेव्हा त्या व्यक्तीवर तुमचं इम्प्रेशन पडतं. हीच बाब मुलींनाही लागू पडते. या अनेक रिसर्चही करण्यात आलेत. ज्यातून समोर आलं की, मुलं मुलींच्या स्माईलकडे सकारात्मकता आणि दिलखुलासपणाशी जोडून बघतात. जर तुम्हाला एखाद्या मुलाला तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुमची स्माईल तुमचं काम करेल.
सुंदर केस
मुली उगाच तासंतास पार्लरमध्ये बसून हेअर स्पा आणि हेअर ट्रीटमेंट नाहीत करत. त्यांना हे माहीत असतं की, याने त्यांच्या सौंदर्यातही भर पडते आणि मुलांचंही अटेंशन त्यांना मिळतं. कोणत्याही मुलीच्या सौंदर्यात तिच्या केसांची महत्त्वाची भूमिका असते. मुलींचे केस मुलांना फार आकर्षित करतात.
आवाज
मुलींचा आवाजही मुलांना आकर्षित करतो. गोड पण स्पष्ट आवाज असलेल्या मुली मुलांना अधिक पसंत असतात. मुलींच्या बोलण्याच्या स्टाईलवरूनही त्यांच्याबाबत मुलं जाणून घेत असतात. उदाहरणार्थ बोलताना मुलींचा टोन नरम असेल तर तिचा स्वभाव शांत आणि कोमल असेल. तेच मोठा आवाज असलेल्या मुलींचा स्वभाव सामान्यपणे आक्रामक असतो.