(Image Credit : No Label)
मुलांना सांभाळणं फारसं सोपं नसतं. त्यांचा सांभाळ करताना आई-वडिलांच्या तर नाकी नव येतात. खासकरून तेव्हा जेव्हा मुलं हट्ट करतात. त्यातही त्यांचे हट्ट म्हणजे, अगदी जगावेगळे. अशावेळी त्यांना समजावणं अत्यंत कठिण होतं. कधीकधी तर आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी मुलं रडण्यास सुरुवात करतात. असं जास्तीत जास्त 1 ते 5 वर्षांपर्यंतची मुलं करत असतात. पब्लिक प्लेसवर मुलं जर हट्ट करू लागली तर मात्र आई-वडिलांना काय करावं ते सुचतं नाही. अशावेळी चारचौघांच्या नजरा मुलं आणि आई-वडिलांवर खिळतात. अशातच आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून मुलांचा हट्ट आणि पब्लिक प्लेसमध्ये मुलांमुळे सामना कराव्या लागणाऱ्या ऑकवर्ड सिच्युएशन्स हॅन्डल करण्यासाठी तुम्हाला मदत होइल...
- कधी-कधी मुलांचा हट्ट आणि त्यांचे नखरे इग्नोर करणं अधिक उत्तम असतं. जर मुलांना हट्ट करण्यापासून रोखलं तर ते मुद्दाम आणखी हट्ट करणयस सुरुवात करतात. जर तुम्ही त्यांच्या रागावर आणि हट्ट करण्याकडे जास्त लक्ष दिलतं तर हळूहळू ते जास्त हट्ट करू लागतात. त्यामुळे त्यांनी कितीही हट्ट केला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं फार उत्तम ऑप्शन आहे.
(Image Credit :parentspartner.com)
- तुमचं मूल जेव्हा हट्ट करतं तेव्हा त्याचा हट्ट पूर्ण करण्याऐवजी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. मुलांना यादरम्यान कधीही मारू नका. तसेच तू 'बॅड बॉय' आहेस किंवा 'बॅड गर्ल' यांसारख्या शब्दांचा प्रयोग करणं टाळा.
- पब्लिक प्लेसवर तुम्हाला मुलांमुळे मान खाली घालावी लागू नये म्हणून, काही गोष्टींसाठी स्वतःला तयार करा. जसं मुलं एक काम सोडून दुसरं काम करण्यासाठी जातात, त्यावेळी त्यांचा मूड खराब होतो.
- मुलं एकदा इमोशनल झाली तर ती नॉर्मल पद्धतीने विचार करत नाहीत. अशातच तुम्ही गोष्टी धीराने हाताळणं गरजेचं असतं.
(Image Credit : Parents Magazine)
- जर तुम्हाला वाटलं की, मुलांचा मूड बिघडणार आहे. तर त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर त्यांना प्रेमाने समजवा आणि त्यांना तुमच्यासोबत कंफर्टेबल ठेवा. त्याचबरोबर त्यांचं लक्षं दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.