(Image Credit : www.videoblocks.com)
लग्नाचा निर्णय हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात महत्त्वाचा निर्णय असतो. त्यांच्या या एका निर्णयावर त्यांचं पुढलं सगळं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे लग्नाच्या बेडीत अडकण्याआधी मुलींच्या मनात प्रश्नांना भडीमार होत असतो. त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या या प्रश्नांबाबत एकतर त्या मैत्रिणींकडे बोलतात नाही तर स्वत:त हरवून जातात. तुम्हाला जर वाटत असेल की, मुली लग्नाच्या एक दिवसआधी लग्न किंवा हनीमूनबाबत विचार करत असतील तर तुम्ही चुकताय. चला जाणून घेऊ मुलींच्या मनात लग्नाआधी काय सुरू असतं.
लग्नाबाबत घाई तर होत नाहीये ना?
(Credit : Giphy)
प्रत्येक मुलीच्या मनात लग्नाबाबत वेगवेगळ्या इच्छा असतात. अनेकजण असा विचार करतात की, मुली त्यांच्या लग्नाच्या एक रात्रीआधी त्यांच्या पार्टनर आणि हनीमून डेस्टिनेशनबाबात विचार करत असतील. पण असं अजिबात नसतं. लग्नाच्या एक दिवसआधी अनेक मुलींच्या ही हुरहुर असते की, ती लग्नासाठी घाई तर करत नाहीये ना! त्यांच्या मनात प्रश्न असतो की, खरंच मी लग्नासारखी जबाबदारी घेण्याच्या क्षमतेची झाली आहे?
सासरची मंडळी मला मनापासून स्विकारतील की नाही?
(Credit : Giphy)
मुलींच्या मनात त्यांच्या लग्नाच्या एक दिवसआधी हेही सुरू असतं की, काय माझ्या सासरचे लोक मला माझ्या आई-वडिलांप्रमाणे प्रेम करतील. ते मला खरंच मनापासून स्विकारतील का? मुली सर्वात जास्त टेन्शनमध्ये असतात त्या सासूच्या स्वभावावरून. कारण सासूंची एक वेगळीच इमेज सिनेमा आणि मालिकांनी करून ठेवली आहे.
जोडीदार
भलेही लग्न जुळून अनेक महिने झाले असतील. दरम्यान त्या होणाऱ्या नवऱ्याला भेटल्याही असतील. पण तरी लग्नाच्या एक दिवसआधी त्यांच्या मनात हा प्रश्न येतो की, आपला होणारा नवरा आपल्याला जीवनभर साथ देईल का? तसेच मी माझ्यासाठी योग्य जोडीदाराची निवड केली आहे का?
शारीरिक संबंधाला नाही कसं म्हणू...?
(Image Credit : Gfycat)
वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लग्नाच्या एक दिवसआधी मुली पहिल्या दिवसाच्या शारीरिक संबंधावरूनही टेन्शनमध्ये असतात. त्यांना प्रश्न पडतो की, पहिल्या जर त्यांची शारीरिक संबंधाची इच्छा नसेल तर पतीला नाही कसं म्हणायचं? त्यांना अशीही भीती असते की, पहिल्याच दिवशी नकार दिला तर पतीला असं नको वाटायला की, माझं त्याच्यावर प्रेम नाही.