(Image Credit : thisisinsider.com)
२० वय हे कुणाच्याही आयुष्यातील सर्वात इंटरेस्टींग कालावधी असतो. या वयात व्यावहारीक जगाकडे छोटी छोटी पावले तुम्ही घेत असता आणि याच तुम्हाला तुम्ही ठरवत असता की, तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे. त्यासोबतच तुम्ही तुमचं लव्ह लाइफची हॅन्डल करत असता. त्याला जोडून हार्टब्रेक होणे, संशय, उत्सुकता, हार्मोन्स बदल आणि अशा वेगवेगळ्या भावनांचा खेळ मनात खेळ सुरू असतो. पण हाच तो काळ असतो ज्यात तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळतं ते प्रेमाबाबत आणि नात्यांबाबत. चला जाणून घेऊ या वयात प्रेमाबाबत तुम्ही काय काय शिकत असता.
प्रेम दुसऱ्यांदा होऊ शकतं
सुरूवातीला सगळ्यांना असं वाटत असतं की, खरं प्रेम आयुष्यात केवळ एकदाच होत असतं. पण हे पुढे खोटं ठरतं. अनेकांनी ब्रेकअप किंवा जी व्यक्ती आपल्याला आवडते त्याकडून नकार येणे हे अनुभवलं असेलच. अशात आपला यावर विश्वास बसतो की, आता आपण पुन्हा प्रेमात पडणार नाही. यावर विश्वास बसतो कारण सिनेमांमधून आपण तेच बघत आलो असतो. पण खऱ्या आयुष्यात ब्रेकअप तुमच्या आयुष्यातील प्रेमाचा शेवट नसतो. उलट त्यानंतर आपण नव्या लोकांना भेटत असतो, तेव्हा तुम्हाला नकळत तुम्ही पुन्हा प्रेमात पडलेले असता.
खऱ्या गरजांची जाणिव
असं कोणतही पुस्तक नाहीये की, जे तुम्हाला सांगेल की नात्याकडून किंवा पार्टनरकडून काय हवं असतं. हे पाण्यात पडल्यावर पोहणं येण्यासारखं आहे. तुम्ही हळूहळू यात शिरत जाता आणि तुम्हाला कळत जातं. तुम्ही थोडा वेळ काढून विचार केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की, २० व्या वर्षीच तुम्हाला हे कळत असतं की, तुमच्यासाठी काय चांगलं आहे.
ब्रेकअपच्या त्रासातून बाहेर पडता
बहुतेकांचं पहिलं ब्रेकअप हे २०व्या वयातच होतं. हा सर्वात वाईट असा काळ असतो. तुमचा स्वत:शी लढा सुरू असतो. तुम्हाला वाटत असतं की, आता यातून बाहेर कधीच निघता येणार नाही. किंवा यातून बाहेर कसं निघायचं. सतत तुमच्या एक्सबाबत किंवा सोबत घालवलेल्या क्षणांबाबत विचार करत असता. पण कालांतराने वेळनुसार, तुम्ही यातून बाहेर येता. पण या अनुभवामुळे तुम्ही फार स्ट्रॉग झालेले असता. इथून जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला कशाचाही त्रास होत नसतो. कारण काय तर तुम्ही त्या गोष्टी मागे सोडून आलेले असता.
जीवनाबाबत सिरीअस
ही २० वयात मिळणारी आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणता येईल. या कालावधीत तुम्ही तुमच्या लाइफबाबत सिरीअस होऊन विचार करू लागता. काही लोकांना हे ब्रेकअप झाल्यावर कळतं तर काहींना दुसऱ्यांचे अनुभव पाहून शहाणपण येतं.
नातं केवळ प्रेमापुरतं नसतं
यशस्वी नात्याची रेसिपी केवळ प्रेम या एका गोष्टीमुळे चांगली होत नसते. नातं तेव्हाच चांगलं असतं जेव्हा दोघेही तडजोड करतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांना चांगल्या-वाईटात साथ देतात आणि कधीही एकमेकांची साथ सोड नाहीत. एकमेकांच्या विचारांचा, भावनांचा सन्मा करणे हेही यात महत्त्वाचं ठरतं. या सर्व गोष्टी या वयातच कळायला लागतात.
नातं हे परीकथेतील प्रेमासारखं नसतं
प्रेमाची सुरूवात फारच रोमॅंटिक आणि उत्साहाने होते. I love You म्हणून सतत एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणे, लपून भेटणे, किस करणे या सर्व पहिल्यांदाच केलेल्या गोष्टींची आपल्या मनात एक वेगळीच जागा असते. पण ही फेस काही महिन्यांनी नाहीशी होते. कारण तेव्हा दोघेही एकमेकांना आतून बाहेरून ओळखायला लागलेले असता. तेव्हा तुम्हाला कळतं की, प्रेमाचं नातं केवळ परीकथेतील प्रेमासारखं नेहमी गोड गोड असं नसतं. त्यात भांडणं असतात, रूसवे फुगवे असतात, वाद असतात.