तरूणाईमध्ये सेल्फीची क्रेझ किती आणि कशी आहे हे काही आता वेगळं सांगायला नको. सेल्फी घेणे हा जणू जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. सेल्फीबाबत सांगायचं तर प्रत्येकाची स्टाइल, अॅंगल आणि पोज वेगवेगळ्या असतात. मात्र तुम्ही सेल्फी कशा पद्धतीने घेता यावरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही खूपकाही उलगडतं. इतकेच नाही तर सेल्फीवरून तुम्ही हा अंदाज लावू शकता की, लोक तुमच्याबाबत काय विचार करतात.
सेल्फी काढण्याऱ्यांची टेस्ट
(Image Credit : CBC.ca)
कॉम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेविअरमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, तुम्ही जसे फोटो काढता, त्यावरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत कळून येतं. या रिसर्चमध्ये १२३ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. हे लोक नियमितपणे सेल्फी घेणारे होते. त्यांची पर्सनॅलिटी टेस्ट करण्यात आली.
निष्कर्ष
या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं. जसे की, या लोकांनी फोटो कसा काढला, पोज कशी दिली आणि लोकेशन कसं होतं इत्यादी. याप्रकारे १३ गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सेल्फी घेणाऱ्यांच्या पर्सनॅलिटीला समजून घेण्यात आले.
डक फेस किंवा पाउट
तुम्ही जर तुमच्या सेल्फीमध्ये डक फेस किंवा पाउट करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. याचा अर्थ हा होतो की, तुम्ही भावनिकदृष्ट्या स्टेबल नाही आहात आणि मूडी आहात. हे प्रत्येकालाच लागू पडेल असं नाही, पण या रिसर्चमधून हेच समोर आलं आहे.
जीभ बाहेर काढणे
(Image Credit ; Freepik)
सेल्फी घेताना तुम्हीही जीभ बाहेर काढता का? जर उत्तर हो असेल तर रिसर्चनुसार, तुम्ही फन लव्हिंग आहात आणि असे लोक नेहमीच मस्ती करतात. हे लोक जीवनाला चांगल्याप्रकारे एन्जॉय करण्यावर विश्वास ठेवतात. पण याचा अर्थ हा नाही होत की, तुम्ही कॅमेरासमोर कम्फर्टेबल नाही आहात.
स्माइलवाली सेल्फी
(Image Credit : 1ZOOM.Me)
जर तुम्ही सेल्फी काढताना हसणं पसंत करत असाल तर तुम्ही नवीन गोष्टी अनुभवण्यासाठी अजिबात घाबरत नाहीत. हे लोक बदलांमुळे त्रस्त होत नाही आणि जीवन जो अनुभव देतं तो ते स्विकारतात.
कॅमेरा खाली करून फोटो काढणे
(Image Credit : NBT)
जर तुम्ही कॅमेरा खाली करून फोटो काढणं पसंत करत असाल तर तुम्ही दिलखुलास आणि मैत्रीपूर्ण वागणूक ठेवणारे व्यक्ती आहात, असं या रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे.
फिटनेस सेल्फी
(Image Credit : Newshub)
जर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल आणि फिटनेस प्रवासाचे फोटो काढत असाल तर लोक तुम्हाला शो-ऑफ करणारी व्यक्ती समजू शकता. पण याचा हाही अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या जीवनात फोकस्ड आहात आणि तुम्हाला निरोगी व फिट रहायचं.
बेडरूम सेल्फी
(Image Credit : VideoHive)
जर तुमचे सेल्फी हे जास्तीत जास्त बेडरूमधील असतील किंवा तुम्ही बेडरूममध्ये आराम करतानाचे असतील, तर तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये लोकांना येऊ देण्यात काहीच अडचण नाहीये.
(Image Credit : Live Science)
आम्ही हे तर सांगू शकत नाही की, या रिसर्चचा निष्कर्ष किती बरोबर आहे. पण ही कॉन्सेप्ट नक्कीच चांगली आहे. त्यामुळे जर पुढच्या वेळी सेल्फी काढून सोशल मीडियात शेअर करणार असाल तर या लेखातून टिप्स नक्की घ्या.