-योगिता तोडकर
एका कॉलेजमध्ये पेरेंट्स मीट अर्थात पालकसभा होती. तिथे मला समुपदेशक म्हणून बोलावलं होतं. सगळा कार्यक्र म संपल्यावर काही मंडळी आणि मी असं अनेक विषयांवर बोलणं सुरु होतं. चर्चेला मोकळं वातावरण मिळाल्यावर एका मुलाची आई म्हणाली ही आजकालची मुलं कपडे बदलल्यासारखे बॉय फ्रेण्ड, गर्ल फ्रेंड बदलतात. नशीब आपलं, घरी आपल्याशी बोलतात तरी. एका मुलाचे वडील म्हणाले, अहो माझा मुलगा मी वापरतो तसेच सगळं त्याला वापरायचं असत. देव कृपेने आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यामुळे मी त्याला घेऊन देतो. पण या वयात हे ब्रॅण्डचं वेड. कसं करावं. मी त्यांना म्हटलं मंडळी हे सगळं वागायला मुलं कुठून शिकत असतील? सगळे म्हणाले शिकवायला कशाला लागत आजूबाजूला दिसत आणि हे तेच करतात. मी त्यांना म्हटलं घराबाहेर दिसण्यासाठी घरातून पाऊल बाहेर ठेवल्यावर बाहेरच दिसतं. तोपर्यंत आधी आपल्या घरात काय चालू आहे हे मुलं शिकतात. आपल्यापैकी किती जण मुलांना नाती सांभाळायला शिकवतो. आपले किती नातेवाईक मुलांना माहित असतात? कोणत्याही नातेवाईकांच्या कार्यक्र मांना मुलांना आपण नेणं गरजेचं समजतो का? नेमकं अशा ठिकाणी आपण त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य देतो. उलट आपण तिथे कौतुकाने सांगतो तो आता मोठा झालाय ना, त्यामुळे मित्र मैत्रिणींच्यात व्यस्त असतो. बर ही मुलं आपल्याबरोबर आली तरी आपल्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसतात. नाती जपण्यासाठी संभाषण होणं गरजेचं असतं हे कुठे आपण त्यांना दाखवून देतो. घरी आल्यावर आपल्याकडून त्या कार्यक्र मामध्ये काय छान गोष्टी समोर आल्या, कोणाचं कौतुक याऐवजी काहीतरी नकारात्मत्मक चर्चा जास्त होतात. या सगळ्यातून मुलं नाती जपायला शिकणार कशी? आणि मग त्यांनी गर्ल फ्रेण्ड, बॉय फ्रेण्ड कपड्यासारखे बदलले तर ? त्यांच्या नात्यासंबंधी निर्णयाच्या दिशा, आपण त्यांना काय दाखवतोय त्यांच्या समोर नाती कशी जपतोय यावर पूर्णपणे अवलंबून आहे. ब्रँड वापरण्याबद्दल बोलायचं झालं तर, आपणच तर ब्रँडेड च्या आहारी गेलेलो असतो. आपण मुलांना फिरायला कुठे घेऊन जातो, मॉल मध्ये. मोकळ्या हवेत अथवा जिथे मुलं नवीन काही शिकतील अशा ठिकाणी आपणच त्यांना नेत नाही. तो जेंव्हा पहिल्यांदा ब्रँडेड काही मागतो तेंव्हा आपल्याला कौतुकच वाटतं. मग नंतर त्नास होतो. पहिल्यांदाचा त्याला, त्याने काय मागितलं आहे. त्याची किंमत किती आहे. ते पैसे कमावण्यासाठी किती कष्ट पडतात याची जाणीव आपण त्यांना करून देतो का? आधी आईसक्रि मची सवय लावल्यावर त्याला चॉकलेट कसं छान हे सांगण्यात अर्थ नाही. तसेच तुम्ही स्वतर्च जर आइसक्रि म खात असाल तर मुलं चॉकलेट खाणार नाहीत.मुलांच्या निर्णयाकडे पाहताना पालक त्यांच्या पिढीच्या विचारसरणीतून पाहतात, पण मुलांना जग दाखवताना मुलांच्या पिढीची गरज मान्य करतात. या दोन्हीमध्ये असलेले अंतर लक्षात घेऊन पालकांनी मुलांच्या निर्णयाबद्दल ठोकताळे मांडले तर मुलांचे वागणे समजून घेणे पालकांसाठी सहज होईल.(लेखिका समुपदेशक आहेत.)