( image credit-maharaniweddings.com)
लग्न करायचं म्हटलं की सगळ्यात आधी विषय निघतो तो म्हणजे मुलामुलींच्या वयाचा. आताच्या काळात वय हा फॅक्टर जास्त पाहिला जात नाही. हे जरी खरं असलं लग्न होत असताना वय विचारूनच मग पुढच्या गोष्टी केल्या जातात. शक्यतो मुली आपल्यापेक्षा ४-५ वर्ष मोठा असलेल्या मुलासोबत लग्न करतात. अगदीच नाही तर समवयस्क मुलासोबत लग्न करतात. पण लग्नासाठी मुलापेक्षा मुलगी लहान असावी या संकल्पनेमागे कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला लग्नासाठी वय का विचारात घेतलं जातं याबद्दल सांगणार आहोत.
(Image credit- be yourself)
विचारांमधिल वेगळेपणा
मुली मुलांपेक्षा लवकर मॅच्युअर होतात, असं म्हटलं जातं. पती-पत्नी दोघंही एकाच वयाचे असतील तर त्यांचे विचार एकमेकांशी जुळणार नाहीत, ज्यामुळे त्यांच्यात सातत्याने भांडणं होत राहतील. त्यामुळे दोघांच्याही वयात अंतर असणं गरजेचं आहे. कारण जर मुलगा लहान असेल तर समजून घेण्यास समस्या निर्माण होत असते. म्हणून मुलगा मोठा असल्याने नात्यात भांडण कमी होतात.
महिलांमध्ये होणारे हार्मोन्सचे बदल
आपण बघतो की बीझी लाईफस्टाईलमध्ये काही मुलींचा चेहरा तरूण वयातचं निस्तेज झालेला असतो. त्यामुळे त्या वयाआधीच म्हातारपणं आल्यासारख्या दिसतात. महिलांमध्ये हार्मोन्स बदल होत असतात, ज्यामुळे त्या पुरुषांपेक्षा वयाने मोठ्या दिसू लागतात. पतीपेक्षा पत्नीचं वय जास्त दिसू नये म्हणून कमी वयाच्या मुलीसह लग्न केलं जातं. कारण जर समान वय असेल तर काहीवेळा पत्नी पतीपेक्षा मोठी आहे असं सुद्धा दिसू शकतं. ( हे पण वाचा-पार्टनरकडून गरजा पूर्ण होत नसतील तर काय कराल?)
मुलींना भावनीक आधार
वयाने मोठ्या असलेल्या मुलांना अनुभव सुद्धा खूप असतात. त्यामुळे पार्टनरला कोणत्याही परिस्थितीत समजून घेण्यात आणि आधार देण्यात मुलं सफल होतात. मुलांपेक्षा मुली जास्त भावूक असतात. त्यामुळे आपल्या मुलीला भावनिकरित्या आधार देईल, असा मुलगा शोधण्याचा प्रयत्न मुलीच्या पालकांचा असतो. जर त्याचं वय जास्त असेल तर तो मुलीला भावनिक आधार चांगल्याप्रकारे देऊ शकतो. ( हे पण वाचा-'या' तीन राशींचे पार्टनर आपल्या भावना ठेवतात लपवून!)
( टिप-या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)