मुलं जेव्हा रिलेशनशीपमध्ये येत असतात. त्यावेळी जर त्यांच्या वयापेक्षा मोठी मुलगी असेल तर जास्त त्यांना जास्त आवडत असतं. जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तर ही खूपच सामान्य गोष्ट आहे. कारण अनेक मुलांना त्यांच्यापेक्षा मोठया असलेल्या मुली खूप आवडतात. या आकर्षणामागचं नेमके कारण काय आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वयाने मोठ्या असलेल्या मुलींची मॅच्यूरीटी मुलांना आवडत असते. वयाने मोठ्या मुली मुलांची जास्त काळजी घेतात, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देतात, त्यांच्यावर जास्त प्रेम करतात, शरीरसंबंधादरम्यानही त्या पुढाकार घेऊन मुलांचा इच्छा पूर्ण करतात. बहुतांश मुलांना वयाने मोठ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते. सहसा मुले ही गोष्ट ही गोष्ट बोलून दाखवत नाहीत, मात्र हे सत्य आहे. वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींची मॅच्युरिटी मुलांना आवडते.
साधं राहणीमान
वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये साधे राहणे, कमी मेकअप करणे, स्टायलिश पण सिलेक्टीव्ह गोष्टी घेणे असे बदल होतात. त्यांच्या याच गोष्टी मुलांना अधिक भावतात कारण मुलांना सहसा शोऑफ करणे आवडत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या वयापेक्षा मोठी असलेली मुलगी आवडते. ( हे पण वाचा-पार्टनरच्या आयुष्यात तुमच्याशिवाय अजून कोणी असेल तर कसं ओळखाल?)
जबाबदारीची जाणीव
मुलांपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुली या साहजिकच स्वतःच्या पायावर उभ्या झालेल्या असतात. त्यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमता असते. तुलनेने कमी वयाच्या मुली कमवत नसल्यामुळे जबाबदारी उचलू शकत नाहीत. आपल्या जोडीदाराकडेही त्या असेच लक्ष देतात. याच गोष्टीमुळे वाईट काळाचा सामना मोठ्या वयाच्या मुली जास्त खंबीरपणे करतात. ( हे पण वाचा-ब्रेकअपनंतर पुन्हा पॅचअप करायचं असेल तर वापरा 'हा' फंडा)