पत्नी, पत्नी किंवा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं नातं खूप वेगळं असतं. या नात्यात भांडण गोडवा असे अनेक प्रसंग येत असतात. या प्रसंगांना तोड देत नातं टिकून राहत असतं. नकळतपणे नात्यात अशा सुद्धा गोष्टी घडत जातात. ज्यामुळे दुरावा निर्माण होतो. भांडणं होतात. हे फक्त ठराविक कपल्सच्या बाबतीत होतं असं नाही. तर ही गोष्ट सुंदर पार्टनर असेल तरी सुद्धा होत असते. अनेकदा गर्लफ्रेंड किंवा पार्टनर सुंदर असेल तरी मुलं सोडून जातात. असं करण्यामागे अनेक कराणं असू शकतात आज आम्ही तुम्हाला असं करण्यामागे काय कारण असतं. त्याबद्दल सांगणार आहोत.
लग्न झाल्यानंतर जर जीवनात रोज भांडणं होत असतील तर पतीला वाटते की, आपण विश्वासघात केला तरी चालेल. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. कारण त्यांना परिस्थितीजन्य कराण मिळालेलं असतं. अनेकांनी बालपणात आई-वडील एकमेकांना धोका देताना पाहिलेले असेल तेव्हा त्यांना असे करण्यात काहीच गैर वाटत नाही. ते कोणताही संकोच न करता आपल्या पत्नीला धोका देतात. कराण त्यांना आपण असं करून कोणतही चूक करत आहोत असं वाटत नाही.
लग्न झाल्यानंतर पतीला त्यांची आधीची गर्लफ्रेंड भेटते तेव्हा वैवाहिक असल्यावर देखील पत्नीला धोका देतात. कारण त्यांना आपली गर्लफ्रेंड येवढ्या वर्षांनंतर भेटली हे खुप चांगले वाटते. तसंच पत्नी ही घरी रोजचं भेटत असल्यामुळे त्यांना पत्नीचा कंटाळा आलेला असतो. अर्थात सगळेच पुरूष तसे नसले तरी काहीजण असे असतात त्यांना रोजचं पार्टनरसोबत राहण्याचा कंटाळा येत असतो.
अनेक वेळा अशी स्थिती येते की, पतीला कळतच नाही की, त्यांनी कसे काय आपल्या पत्नीला धोका दिला. ते नकळत दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात आणि ती त्यांची ती मुलगी काळजी घेऊ लागते. मग स्वतःच्या पत्नीपेक्षा इतर मुली महत्वाच्या वाटत असतात. ( हे पण वाचा- सुंदर मुलींना बघून का उडू लागतो काही लोकांचा थरकाप? जाणून घ्या आश्चर्यजनक कारण... )
काही पुरूष पत्नी सुंदर असून सुद्धा वैवाहिक जीवनात संतुष्ट नसतात. कारण त्यांना शारीरिक सुखाची कमतरता जाणवत असते. मग असे पुरूष आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी गर्लफ्रेंडसोबत रिलेशन ठेवतात. (हे पण वाचा- तुम्हाला माहितही नसतील,सुंदर स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात येतात 'या' ८ गोष्टी!)