अनेकदा नवर्याला वाटतं की आपण इतकं चांगलं वागतो, इतके पैसे कमावून आणतो. बायको जे जे मागेल ते ते देतो. तिला काही कमी पडू देत नाही. संसाराच्या गरजा भागवतो, त्यासाठी मरमर राबतो तरी हिचं तोंड वाकडंच. कायम पापड मोडलेला. सतत चिडचिड. टोमणे मारणं. हिला काय कमी पडतं हेच कळत नाही. सतत भांडणं उकरून काढते. ती असं का वागत असेल? याचा जर नीट अभ्यास केला तर ढोबळमानानं काही कारणं सापडतात. ही कारणं म्हणजे हमखास नवरा बायकोच्या भांडणाचं मूळ. बाकी व्यक्तिगत कारणं तर असतातच. पण ही कारणं अशी आहेत की, बायकोला वाटतं नवर्याचं आपल्याकडे दुर्लक्ष होतं. त्याचं आपल्याकडे लक्ष नाही. तो आपल्याला भाव देत नाही. आणि आपण नवर्यासाठी काहीच महत्वाच्या नाही. असं वाटतं म्हणून ती कटकटत राहते. कधी उघड नाराजी व्यक्त करते कधी हुप्प फुगा होते. तर तो ता फुगा का होतो याची ही 5 कारणं. पुरुष या चूका करतात आणि म्हणून बायकोचा फुगा होतो.
1) काही कॉम्प्लिमेण्ट देत नाही.अनेक पुरुष बायकोला चुकून कधी कॉम्प्लिमेण्ट देत नाही. म्हणजे कुठं बाहेर जायचं असो, तिनं नवीन ड्रेस घातलेला असो, नवीन दागिना, हेअरस्टाईल, पर्स हे सारं ते नोटीस करत नाहीत. विचारलं कसं दिसतं तरी बरंय यापलिकडे काही बोलत नाहीत. किंवा फार काही भारी नाही म्हणत टवाळी करतात.आणि बायको भडकते.
2) बायकोचा फोटोअलिकडे ऑफिसात डेस्कवर फॅमिली फोटो ठेवतात. पाकिटात ठेवतात. घरात फ्रेम करुन ठेवतात. मोबाइल स्क्रीन सेव्हर. फेसबूक प्रोफाइल, कुठंही बायकोचा चेहरा दिसत नाही. चुकून कधी बायकोचा फोटो पोस्ट केला जात नाही. मग बायकोला वाटतं की आपण याला आवडत नाही, याचं आपल्याकडे लक्ष नाही.
3) कहीं पे निगाहेबाहेर जेवायला, फिरायला गेलं तरी लक्ष दुसर्या बाईकडे. किंवा मोबाईलवर मैत्रिणीशी बोलणं, बायको चिडणार नाही तर काय?
4) गिफ्ट कधी दिलं?अनेक नवरे वर्षानुर्वे बायकोला गिफ्ट देत नाही. शेवटचं कधी गिफ्ट दिलं त्यांना आठवत नाही. वाढदिवसालाही तुला आवडेल ते घेवून ये असंच सांगतात. त्यानं बायकोचा मूड जातो.
5) सतत फोनमध्ये लक्षबायको बोलतेय, पण आपलं लक्ष सतत फोनमध्ये. फोनवर गेम खेळताय नाही तर व्हॉट्सअॅप. बायकोचा भडका उडतो तो इथेच.