शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

ऑफिस पार्टीनंतर फोन उचलत नव्हती महिला, पतीला आला भलताच संशय; दिली 'ही' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 6:54 PM

दाम्पत्यांमध्ये एकमेकांवर संशय घेण्याची वृत्ती वाढताना दिसते. अनेकांना आपल्या पार्टनरवर विश्वास नसतो. काहीजण एकमेकांशी बोलून यावर उपाय शोधतात, तर काही जण तज्ज्ञांचा सल्ला घेतात.

पती आणि पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. पती-पत्नीत एकामेकांशी वाद आणि छोटीमोठी भांडणं होत असतात, पण एकमेकांवर विश्वास असेल तर त्या भांडणाचा परिणाम होत नाही. अलीकडे दाम्पत्यांमध्ये एकमेकांवर संशय घेण्याची वृत्ती वाढताना दिसते. अनेकांना आपल्या पार्टनरवर विश्वास नसतो. काहीजण एकमेकांशी बोलून यावर उपाय शोधतात, तर काही जण तज्ज्ञांचा सल्ला घेतात.

अशाचा एका प्रकरणातील पतीला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबध (Extra Marital Affair) असल्याचा संशय आहे. त्या व्यक्तीने सांगितले की, ‘आमच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. मी ३५ वर्षांचा आहे आणि पत्नीचे वय ३१ आहे. याशिवाय आम्हाला एक २ वर्षाचा मुलगाही आहे. एकदा माझी पत्नी एका ऑफिस पार्टीला गेली होती; पण पार्टीनंतर ती घरी आली नाही. त्यामुळे मला वाटतं की तिचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर आणि शारीरिक संबंध आहेत.’

आपल्या पत्नीबद्दल सांगताना त्या व्यक्तीने सांगितले की, ‘त्याची पत्नी अभ्यासात खूप हुशार आहे, त्यामुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिला बँकेत नोकरी मिळाली. तिने तिच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती केली, यश मिळवलं आणि आता ती माझ्यापेक्षा जास्त कमावते. बाळ जन्माला आले तेव्हापासून मी त्याची काळजी घेतो आहे आणि माझी पत्नी ऑफिसला जायची. नंतर तिने आधीची नोकरी बदलली आणि ती मोठ्या बँकेत रुजू झाली. तिला नवीन बँक खूप आवडली, तिथे बरेच मित्र बनवले. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की नवीन बँकेत गेल्यानंतर ती माझ्यापासून दूर जाऊ लागली. दुरावा तर आलाच शिवाय तिने जिमची मेंबरशिप (Gym Membership) घेतली. अचानक तिला तिच्या दिसण्याबद्दल आणि शरीरयष्टीबद्दल खूप काळजी वाटू लागली. तिने व्यायाम आणि डाएट करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे, मी सतत घरीच असल्याने माझे वजन खूप वाढले आहे.’

नंतर त्या व्यक्तीने सांगितले की, एके दिवशी माझी पत्नी ऑफिस पार्टीला गेल्यानंतर मी तिला फोन केला, पण तिने एकदाही फोन उचलला नाही. यानंतर तिने मला मेसेज केला ज्यात लिहिलं होतं की मी खूप दारू प्यायली आहे आणि एका मित्रासोबत सोफ्यावर पडणार आहे. तिच्या बोलण्याने मला धक्का बसला असून त्यावर मला विश्वास नाही. शिवाय तिला माझं वजन खूप वाढलं असल्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत, असं तिने सांगितलं. दरम्यान, अलीकडेच माझ्या पत्नीने आमच्या नातेसंबंधावर काम करण्याची गरज असल्याचं कबूल केलं.’

तज्ज्ञांचा सल्ला काय?तज्ज्ञ म्हणतात की, ‘एका घटनेनंतर तुम्ही तुमच्या पत्नीविषयी असं मत बनवणं योग्य नाही. तुम्हा दोघांच्या प्रायॉरिटी वेगळ्या आहेत. तुमची पत्नी तिच्या करिअरवर फोकस करत आहे, तर तुमची प्रायॉरिटी (Priority) तुमचं मूल आहे, ज्याला तुमची खूप गरज आहे. तुम्ही दोघंही आपलं काम खूप चांगलं करताय, यासाठी तुमचं कौतुक करायला हवं. पण दोघांनाही येणाऱ्या अडचणीबद्दल तुम्ही एकमेकांशी बोलायला हवं. सर्वांत महत्वाचं म्हणजे तुमच्या पत्नीचे अनैतिक संबंध (Affair) असल्याचा तुम्हाला केवळ संशय आहे. ती तुमची फसवणूक करत असल्याचा कोणताही पुरावा तुमच्याकडे नाही. अशा वेळी कोणताही टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा एकमेकांसाठी वेळ काढून आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवा. यामुळे तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.'

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपJara hatkeजरा हटके