पार्टनरने प्रेमात दगा दिल्यानंतर आणि एकटेपणामुळे महिला रिवेंज अफेअर(बदल घेण्यासाठी केलेलं अफेअर) करतात असं एका सर्वेमधून समोर आलं आहे. म्हणजे महिला रिलेशनशिपमध्ये दगा मिळाल्यावर दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर करण्याची संख्या वाढत आहे असंही यात सांगण्यात आलं आहे. एका वेबसाइटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेनुसार, महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक रिवेंज अफेअर करतात. तसेच दगा देणाऱ्या लोकांपैकी एक तृतियांश लोक जुन्या पार्टनरला पर मिळवण्यासाठी अफेअर करतात आणि यातील ८१ टक्के लोकांना असं करण्यात संतुष्टी मिळते.
या सर्वेच्या निष्कर्षातून समोर आलं की, महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त रिवेंज अफेअर करतात. यात ३७ टक्के महिलांनी हे मान्य केलं की, त्यांनी हे अफेअर त्यांचं जुनं प्रेम किंवा सोडून गेलेला पार्टनर परत मिळवण्यासाठी केलं. तर हीच बाब ३४ टक्के पुरुषांनी मान्य केली. पार्टनरचं सत्य उघड झाल्यावर केवळ २५ टक्के लोकच ब्रेकअप किंवा वेगळं होण्याचा निर्णय घेऊ शकतात.
हा सर्वे एका ब्रिटीश वेबसाइटने केला होता. ज्यात १ हजार लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. सर्वेनुसार, १० पैकी ४ लोकांनी रंगेहाथ पकडल्या गेल्यानंतरही आणि पार्टनर समोरच अफेअर संपवण्याचं वचन दिल्यानंतरही आपल्या पार्टनरला भेटणे सुरुच ठेवले. गेल्यावर्षी महिलांचे रिवेंज चीटिंगची काही प्रकरणेही समोर आल्याचे बोलले जाते. रिलेशनशिप एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, महिला एका चुकीच्या किंवा खराब नात्यात अडकलेल्या असतात, पण जास्तीत जास्त आर्थिक कारणांमुळे वेगळं होण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत.
तसेच रिवेंज अफेअर करण्यामागचं एक मुख्य कारण असतं. ते म्हणजे त्यांना आपल्या पार्टनरला दाखवायचं असतं की, दगा दिल्यानंतर कसं वाटतं. त्यासोबतच 'जशास तसे' असा असलेला हा फंडा कामही करुन जातो. अशा स्थितीत दोन्ही पक्षातील लोकांना त्यांचं महत्त्व समजून येतं.