मायकल जॅक्सनचा चुकीचा उल्लेख; डोनाल्ड ट्रम्पवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2016 8:38 AM
प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सनचा भाऊ जेरमाइन जॅक्सन अमेरिकेच्या राष्टध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फारच नाराज आहे.
प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सनचा भाऊ जेरमाइन जॅक्सन अमेरिकेच्या राष्टध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फारच नाराज आहे. त्यांनी मायकल जॅक्सनचा चुकीचा उल्लेख केला होता. ट्रम्प यांनी सीएनएनच्या एका कार्यक्रमात कोलंबिया येथे बोलताना म्हटले होते की, पॉप सम्राट मायकल जॅक्सनची खरी गोष्ट मला ठाऊक आहे.मायकल जॅक्सनचे 2009 मध्ये वयाच्या 50 वर्षी चुकीचे आणि प्रमाणाबाहेर औषध दिले गेल्याने निधन झाले होते. 69 वर्षीय ट्रॅम्प म्हणाले की मायकल हा माझा चांगला मित्र होता. न्यूयॉर्क येथील ट्रम्प टॉवर येथे तो बरेच दिवस राहात होता. मला त्याची खरी कथा ठाऊक आहे. तो अतिशय प्रतिभासंपन्न कलावंत होता. मात्र शस्त्रक्रिया योग्य पद्धतीने न झाल्याने त्याने त्याचा आत्मविश्वास गमावला होता. आत्मविश्वास गमावल्यावर प्रतिभाही हळुहळ कमी होत जाते.61 वर्षीय जेरमाइनने टिष्ट्वट करून ट्रम्प यांना अशाप्रकारचे वक्तव्य न करण्यास सांगितले आहे. मायकलने आत्मविश्वास गमावला होता म्हणणे म्हणजे त्याचा अपमान करणे होय.