नितांशी गोयल
जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कोणतेही पाऊल उचलता किंवा कोणतीही चांगली गोष्ट करायला जाता. तेव्हा लोक तुम्हाला खूप सारे सल्ले देतात. अशावेळी आपण गोंधळून जातो की नेमके काय करायचे? कुणाचे ऐकायचे? पण मनाचे ऐका, पालकांचे मार्गदर्शन घ्या आणि जे काम आपल्याला करायचे ते पूर्ण प्रेमाने करा.
मी अगदी लहान वयात डान्स शिकण्याला सुरुवात केली. पुढे काही शो, जाहिराती, मालिका आणि चित्रपटातून अभिनय शिकत गेली. बालपणापासून या करिअरमध्ये अनेक आव्हाने स्वीकारावी लागली आणि त्यातून मी खूप काही शिकत गेले. आजही कॉलेज आणि शूटिंग अशा दोन्ही गोष्टी एकत्र करताना कसरती कराव्या लागतात. मात्र हे दोन मित्र तुमच्याकडे असतील तर आयुष्यात तुम्ही काहीही मिळवू शकता. एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरा मेहनत.
आज तेच लोक म्हणतात...मी तीन वर्षांची होईपर्यंत बोलू शकत नसल्याने अनेक लोक माझ्याविषयी नकारात्मक बोलत. काहींनी तर माझी सर्जरीकरा असा सल्लाही कुटुंबीयांना दिला. आज तेच लोक म्हणतात की आम्हाला आधीपासूनच ठाऊक होते की ही एक दिवस स्टार बनेल.
आई-वडिलांसोबत मित्रांप्रमाणे वागामाझ्या करिअरमध्ये आई-वडिलांचा सल्ला मोलाचा ठरत आला. त्यांनी एखाद्या गोष्टीला विरोध केला तर ते आपल्या हिताचा विचार करतात हे लक्षात घ्या. पालकांसोबतचे मैत्रीचे नाते ठेवा. लोक म्हणतील, ‘आपणही असे व्हावे’लोक मला पूर्वीही विचारायचे आणि आताही विचारतात की तुला काय व्हायचे आहे. मी सांगते, मला असे व्हायला आवडेल की ज्याला पाहून लोक म्हणतील आपणही असे व्हावे.चूक झाली तर लगेच माफी मागा nकुणाला दुखावू नका, चूक झाली तर लगेच माफी मागणे शिका.nतुमचा हेतू नेहमी पारदर्शक आणि सत्य ठेवा.nचांगले काय आणि वाईट काय याची पारख करणे शिका. ( संकलन : महेश घोराळे )