घरात जाताना आपण चप्पल बाहेर काढतो, ती काढताना पाय इकडे तिकडे लागून उलटी पडते. तेव्हा घरातील कोणी पाहिले की, चप्पल सरळ कर असे सांगितले जाते. लहानपणापासूनच आपण असे ऐकतो, कारण माहिती नसते पण मोठेपणी उलटी चप्पल दिसली की आपणही ती सरळ करतो. मग ती कोणाचीही असो. पण असे का केले जाते, त्यामागे कारण काय? माहितीये का?
घरात चप्पल उलटे राहिले की, आपल्याला सांगितले गेलेय की ते सरळ करावे. यामागचे कारण काय आहे, चप्पल उलटे राहिले की घरात भांडण होऊ शकते किंवा लक्ष्मी नाराज होते, असे सांगितले जाते. परंतू यामागे शास्त्रीय कारण नाहीय. हा विश्वासाचा, आस्थेचा भाग आहे.
असेही मानले जाते की, चप्पल बूट उलटे ठेवले तर घरात आजारपण, दु:ख आदी गोष्टी येऊ लागतात. यामुळे नकारात्मक उर्जा येते. यामुळे घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. घरातील सकारात्मक वातावरण बदलते. यामुळे कुटुंबाच्या सुखशांतीमध्ये अडचणी येऊ लागतात. सोबतच उलटे चप्पल राहिल्यास शनीचा प्रकोपही होतो.