पलूस : पलूस तालुक्यातील रस्ते व इतर विकासकामांसाठी राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व आमदार मोहनराव कदम यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन निधी व इतर योजनांमधून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र (आप्पा) लाड यांनी दिली.
लाड म्हणाले, जिल्हा नियोजनमधून रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुंडल ते माळवाडी (भाग कुंडल), तुपारी ते दह्यारी, आंधळी ते वाझर, खंडोबाचीवाडी ते धनगाव, नागराळे ते कालवा, अंकलखोप ते राडेवाडीसाठी प्रत्येकी २० लाख, बोरजाईनगर ते अनुगडेवाडीसाठी १९ लाख, सावंतपूर ते पलूससाठी १८ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ते दुधोंडी २५ लाख, हजारवाडीसाठी २५ लाख रुपये मंजूर आहेत.
जनसुविधा योजनेतून ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यामध्ये सावंतपूर (१० लाख), खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत इमारत (२० लाख), भिलवडी स्टेशन (५ लाख), आमणापूर (१० लाख), तुपारी (५ लाख), नागराळे (७ लाख), नागठाणे (५ लाख), संतगाव (५ लाख), खटाव (४ लाख), चोपडेवाडी (४ लाख), अंकलखोप (५ लाख), पुणदी (५ लाख), दुधोंडी (५ लाख), सांडगेवाडी (५ लाख), आंधळी (४ लाख) आदी गावांचा समावेश आहे. ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रासाठी ४० लाखांचा निधी मंजूर आहे. त्यामध्ये बांबवडे सिद्धनाथ देवालय, कुंडल ज्योतिर्लिंग मंदिर, बुरुंगवाडी ब्रम्हानंद मठ, सांडगेवाडी भवानी मंदिर, आमणापूर आंबाजी बुवा मठ, चोपडेवाडी लक्ष्मी मंदिर, हजारवाडी लक्ष्मी मंदिर, संतगाव हनुमान मंदिरासाठी प्रत्येकी ५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
नागरी सुविधा योजनेतून १ कोटी ३८ लाखांचा निधी मंजूर आहे. यामध्ये रामानंदनगर, सावंतपूर, दुधोंडी, नागठाणे, अंकलखोप, कुंडल, आमणापूर, वसगडे, बांबवडे, माळवाडी, भिलवडी, बुर्ली आदी गावांचा समावेश आहे.
अतिवृष्टी रस्ते दुरुस्तीसाठी १ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या आमदार फंडातून २ कोटी व आमदार मोहनराव कदम यांच्या आमदार फंडातून ५० लाखांचा निधी मंजूर असल्याची माहिती महेंद्र आप्पा लाड यांनी दिली.
ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.