शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकांना हवेत १०० कोटी

By admin | Published: August 09, 2016 11:05 PM

महापौर परिषदेत मागणी : आयुक्तांबद्दल राज्यातील बहुतांश महापौरांची नाराजी, सहकार्य नसल्याची भावना

सांगली : राज्यात पावसामुळे महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने महापालिकांना १०० कोटी रुपयांचे विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी रविवारी झालेल्या महापौर परिषदेत करण्यात आली. सांगलीचे महापौर हारूण शिकलगार यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्यातील बहुतांश महापौरांनी, आयुक्त सहकार्य करीत नाहीत, असे सांगत नाराजीचा सूर आळवला. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या निवासस्थानी रविवारी राज्यातील महापौरांची परिषद झाली. या परिषदेला चौदा महापालिकांचे महापौर उपस्थित होते. परिषदेच्या उपाध्यक्षपदी मीरा भार्इंदरच्या महापौर गीता जैन यांची निवड करण्यात आली. परिषदेतील चर्चेबाबत पत्रकारांना माहिती देताना हारूण शिकलगार म्हणाले की, परिषदेत अनेक महापौरांनी आयुक्तांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. आयुक्तच सहकार्य करीत नसल्याचा सूर त्यांनी आळवला. पण सांगलीतील स्थिती वेगळी आहे. विद्यमान आयुक्त रवींद्र खेबूडकर पदाधिकारी, नगरसेवकांना सहकार्य करीत असल्याचे मी स्पष्ट केले. महापौरपद हे शोभेचे बाहुले न राहता ते विकासाचे व्हावे, यासाठी जादा अधिकार देण्याच्या मागणीचा ठराव परिषदेत संमत करण्यात आला. पावसामुळे सर्वच महापालिका हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांचे विशेष अनुदान व गुंठेवारी भागाच्या विकासासाठी १०० कोटीचे विशेष पॅकेज देण्याच्या मागणीचा ठरावही करण्यात आल्याचे शिकलगार म्हणाले. महापौर परिषदेतील ठरावाचा राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी अध्यक्षा महापौर स्नेहल आंबेकर व उपाध्यक्षा गीता जैन यांच्यावर सोपविण्यात आल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) अतिथी भत्त्यात वाढीची मागणीमहापौरांना दरवर्षी मिळणाऱ्या अतिथी भत्त्यात वाढ करण्याचा ठराव करण्यात आला. वार्षिक उत्पन्न १०० कोटी असलेल्या महापालिकेच्या महापौरांना ६० हजार रुपये अतिथी भत्ता मिळतो, तो १ लाख २५ हजार करावा, १०० ते ४०० कोटी उत्पन्न असलेल्या महापालिकेत २ लाख, ४०० कोटी ते एक हजार कोटी उत्पन्न असलेल्या महापालिकेत २.५० लाख, तर एक हजार कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महापालिकेत ४.५० लाख रुपये भत्ता करण्याची मागणीही करण्यात आली.