सांगली : कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत ३२ हजार ४४६ शेतकºयांसाठी ९९ कोटी ५ लाख रुपये जिल्हा बँकांच्या विविध शाखांकडे सोमवारी वर्ग करण्यात आले. आजअखेर जिल्ह्यातील शेतकºयांना २२0 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी १४१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
जिल्हा बँकेने आणखी ३६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.आजअखेर जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या तीन याद्या जाहीर झाल्या आहेत. दीड लाखाच्या आतील थकीत शेतकरी, दीड लाखावरील एकरकमी कर्ज परतफेड करणारे शेतकरी व नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी असे वर्गीकरण केले आहे. कर्जमाफीसाठी वारंवार शासनाने नियमात बदल केल्यामुळे रक्कम मिळण्यास विलंब झाला. दिवाळीपूर्वी होणारी कर्जमाफी आता डिसेंबरपर्यंत लांबणीवर गेली.
शासनाने कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकºयांची यादी आणि रक्कम थेट बँकांना पाठविली आहे.जिल्ह्यासाठी ८९ हजार ७९0 शेतकºयांसाठी २२0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी १४१ कोटी ३८ लाख रुपये जिल्हा बँकेला प्राप्त झाले. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत १ हजार ३४६ शेतकºयांसाठी ६ कोटी ५२ लाखांच्या कर्जमाफीचा समावेश होता. दुसºया यादीत १९ हजार ७७६ शेतकºयांचा समावेश होता. त्यांना ७२ कोटी १९ लाखांची कर्जमाफी मिळाली होती.
मागील बुधवारी तिसरी यादी शासनाने जाहीर केली होती. त्यामध्ये ३ हजार ३६ शेतकºयांच्या कर्जमाफीचे ७ कोटी ६६ लाख, तर ५९ हजार ८९२ शेतकºयांसाठी ५४ कोटी ९९ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळाले. शेतकºयांना कर्जमाफीचा दिलासा मिळत असला तरी, अजूनही नियमांमुळे वंचित राहिलेले हजारो शेतकरी शासनाकडून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्हा बँकेकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत ३२ हजार ४४६ शेतकºयांसाठी ९९ कोटी ५ लाख रुपये वर्ग केले. जिल्ह्यातील १0 हजार ६१३ शेतकºयांच्या खात्यावर १८ कोटी २0 हजार रुपये जमा झाले आहेत. कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान तात्काळ जमा करण्याचे आदेश सरकारने जिल्हा बँकेला दिले आहेत.
या कारणांनी महिन्याचा दुसरा शनिवार असूनही बँकेचे कामकाज सुरु होते. रविवारीही कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी शाखा सुरु राहिल्या.जिल्हा बँकेचे अधिकारी, शाखांचे निरीक्षक, शाखाधिकारी व सोसायट्यांचे सचिव यांच्याकडून कर्जमाफीची कार्यवाही केली जात असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी आणि सहकार विभागाचे मुख्य सचिव एस. एस. संधू वारंवार जिल्हा बँकांकडून आढावा घेत आहेत.