ओळी : गौंडवाडी (ता. वाळवा) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ डॉ. चेतना साळुंखे, सरपंच योगेश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गौंडवाडी येथील ४५ वर्षांवरील ग्रामस्थांची कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम १०० टक्के पूर्ण झाली आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानेच हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया आरोग्य अधिकारी डॉ. चेतना सांळुखे यांनी व्यक्त केली. आरोग्य विभागातर्फे सरपंच योगेश लोखंडे यांचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी सरपंच योगेश लोखंडे म्हणाले, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ४५ वर्षांवरील ग्रामस्थांनी लस घेतल्याने आता गाव कोरोनामुक्त हाेण्यास मदत हाेणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी डॉ. सुवर्णा साळुंखे, ग्रामसेविका पूनम निकम, आरोग्यसेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.