सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा उतार कायम असून, कमी संख्येने बाधित आढळत आहेत. बुधवारी जिल्ह्यातील ११ जणांना बाधा झाली, तर २५ जण कोराेनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने एकही मृत्यूची नोंद न झाल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात सरासरी १० ते १५ बाधित आढळत असल्याने संख्या मर्यादित राहत आहे. त्यात मृत्यूचेही प्रमाण कमी झाले आहे.
बुधवारी जिल्ह्यातील सहा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १७२ रुग्णांपैकी ३४ जणांची प्रकृती चिंताजनक अहे. यातील २७ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाने बुधवारी आरटीपीसीआर अंतर्गत २०० जणांच्या नमुन्यांची चाचणी घेतली. त्यात सहा जणांना बाधा झाली आहे, तर रॅपिड ॲंटिजेनच्या ६५५ जणांच्या तपासणीतून पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७,९५४
उपचार घेत असलेले १७२
कोरोनामुक्त झालेले ४६,०३७
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७४५
बुधवारी दिवसभरात
सांगली ३
मिरज २
आटपाडी १
जत ३
कडेगाव ०
कवठेमहांकाळ १
खानापूर १
मिरज तालुका ०
पलूस ०
शिराळा ०
तासगाव ०
वाळवा ०