शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

‘आरटीओं’च्या तिजोरीत ११० कोटींचा गल्ला

By admin | Published: April 08, 2017 12:06 AM

पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्हा अव्वल : इतिहासात पहिल्यांदाच सव्वाशे टक्के जास्त महसूल जमा

सांगली : महसूल जमा करण्यात सांगलीच्या आरटीओ कार्यालयाने पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सुमारे ११० कोटी ३० लाख रुपयांचा ‘गल्ला’ महसुलाच्या माध्यमातून आरटीओंच्या तिजोरीत जमा झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे, अशी माहिती आरटीओ दशरथ वाघुले यांनी दिली. वाघुले म्हणाले, राज्य शासनाकडून दरवर्षी महसूल वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. २०१६-१७ या वर्षासाठी ९४ कोटी १० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टापेक्षाही सव्वाशे टक्के जास्त महसूल जमा झाला आहे. आरटीओ कार्यालयास रस्ता सुरक्षा निधी, दंड, एकरकमी कर, पर्यावरण कर, विविध स्वरुपाची फी या माध्यमातून महसूल जमा होतो. नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना अंकाच्या बेरीज-वजाबाकीचा हिशेब करुन आकर्षक क्रमांक घेण्याची ‘क्रेझ’ वाढली आहे. या माध्यमातून पाच हजार ३३७ वाहनधारकांनी आकर्षक क्रमांक घेतला. यातून चार कोटी ३६ लाखांचा कर मिळाला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन, तसेच विविध गुन्ह्यांत झालेल्या दंडात्मक कारवाईतून सात कोटी ६७ लाखांचा कर जमा झाला. अवैध प्रवासी वाहतुकीच्या ५७० केसीसमधून पावणेदोन लाखाचा दंड वसूल झाला. ‘ओव्हरलोड’ मालाची वाहतूक करताना ९८२ वाहने सापडली. त्यांच्याकडून एक कोटी ५७ लाखांचा दंड वसूल करण्यात यश आले. ही कारवाई आणखी तीव्र करण्यात आली आहे. वाघुले म्हणाले, बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध उघडण्यात आलेल्या कारवाईत ५१० रिक्षाचालक सापडले. त्यांच्याकडून ११ लाख ७० हजाराचा दंड वसूल केला. नियमांचे पालन न करता शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या १४३ वाहनाधारकांकडून चार लाख २१ हजाराचा दंड वसूल झाला. प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना खुलेआम प्रवासी वाहतूक करणारी ७४५ वाहने सापडली. या वाहनधारकांना १३ लाख ७४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. रिफ्लेक्टर नसलेल्या ७६४ वाहनांवर कारवाई झाली. कर बुडविणाऱ्या वाहनधारकांची यादी बनवून कारवाई सुरु केली. यावेळी निरीक्षक सचिन विधाते उपस्थित होते. (प्रतिनिधी)जमा झालेला महसूल...११ कोटी ९७ लाख रुपये विविध ‘फी’तून६ कोटी ५७ लाख रुपये दंडातून७५ कोटी रुपये एकरकमी करातून६६ लाख रुपये रस्ता सुरक्षा निधीतून१ कोटी ६५ लाख रुपय पर्यावरण करातून