जत : तालुक्यात मागील एक वर्षात ११२ कोटी पन्नास लाख रुपयांची विविध विकास कामे प्रशानकीय पातळीवर मंजुर करून घेवून ती पूर्णत्वास नेली आहेत अशी माहीती आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.तालुक्यातील प्रमुख रस्त्यासाठी ७६ कोटी रुपयाचा निधी मंजुर करून घेऊन प्रत्यक्षात कामे सुरू केली आहेत. यातील सर्वच कामे प्रगती पथावर आहेत. आमदार फंडातून सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या दोन आर्थिक वर्षासाठी चार कोटी ७४ लाख सात हजार रुपयांची कामे प्रस्तावित क रण्यात आली आहेत तालुक्यातील वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाला सतत सुचना केली त्यामुळे त्यांनी तीन वाळू तस्करावर गुन्हे दाखल करुन ५८ लाख रुपये दंड वसूल केला आहे. मागासवर्गीय सुधार योजना व २५१५ शिर्षातंर्गत एक कोटी ३१ लाख ५० हजार रुपये निधी करुन घेतला आहे.भारत निर्माण राष्ट्रीय पेय जल व जलस्वराज्य संघर्षात एक त्रीत बैठक घेऊन अपूर्ण काम पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केला आहेत.मागील पाच वर्षापासून तालुक्यातील २३ भारत निर्माण योजनांचे काम रखडले होते त्यापैकी पाच योजना शासनाकडून मंजून करून घेवून प्रत्यक्षात तेथे काम सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले व हे काम प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले, राष्ट्रीय पेयजन अंतर्गत चार गावासाठी पाच कोटी ३५ लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे. टंचाई कालावधीत शासन दरबारी सतत पाठपुरावी करून म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून आलेल्या पाण्यातून एकतीस तलाव भरून घेतले आहेत. त्यामुळे ३७८ टी सी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्व भागातील ४२ गावात म्हैसाळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी ३२ कोटी रुपये देण्याचे लेखी आश्वासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यांचा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून निधी मिळविला जाईल असेही त्यानी यावेळी सांगितले. (वार्ताहर) जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ४२ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानअंतर्गत ४२ गावांची निवड करून ७५५ विविध प्रकारची कामे तेथे सुरू केली आहेत. यापैकी ६४९ कामावर अकरा कोटी ४७ लाख रुपये २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५३ लाख रुपये व २०१५-१६ या आर्थिक वर्षात २७ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या जलयुक्त शिवाराचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना महत्त्वाचा ठरणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
जत तालुक्यात वर्षात ११२ कोटींची कामे
By admin | Published: November 05, 2015 10:57 PM