सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये ३३.८५ टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टी.एम.सी, धोम धरणात ५.५२ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता १३.५० टी.एम.सी, कन्हेर धरणात २.५४ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १०.१० टी.एम.सी., उरमोडी धरणात ६.१३ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ९.९७ टी.एम.सी, तारळी धरणात २.२६ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता ५.८५ टी.एम.सी.आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात ७.४४ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता २५.४० व राधानगरी धरणात १.५८ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ८.३६ टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात २७.४२ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १२३ टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे
कोयना धरणातून १ हजार ५०, धोम ५२६, कण्हेर ४२५, अलमट्टी ९१५०, तारळी ७०. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी (कंसात इशारा पातळी फूटामध्ये) कृष्णा पूल कऱ्हाड १८.९ (४५), आयर्विन पूल सांगली ६.६(४०) व अंकली पूल हरिपूर ९.२ (४५.११).धरण क्षेत्रात पडलेला पाऊस(कंसात १ जून पासून पडलेला पाऊस मि.मी. मध्ये)
कोयना ४० (२४३), धोम ३२(१०६), कण्हेर ९ (८६), वारणा ५५ (१९५), दूधगंगा ६१(२१९), राधानगरी २३(२१०), उरमोडी ३१(१४४), तारळी १०(११९).