कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे मंगळवारी रस्त्यावर फिरणाऱ्या ६१ लोकांच्या अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये इस्लामपूर येथून गावात दूध संकलन करण्यासाठी येणाऱ्या दूधगाडीतील एक जण पॉझिटिव्ह सापडला. ६० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मंगळवारी कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या टेस्टमध्ये गावातील एकही नागरिक पॉझिटिव्ह सापडला नाही. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ४३५ कायम राहिली. आता कामेरी येथे ५८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. येडेनिपाणी उपकेंद्रात मंगळवार १५ जून रोजी १०८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १२ जण कोरोनाबाधित सापडले. एकूण रुग्ण २३९ झाले. उपचार पूर्ण झालेले रुग्ण १३५ असून, मृत्यू २, गृहविलगीकरणात उपचार सुरू असलेले रुग्ण १०० आहेत, २ रुग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
येडेनिपाणी उपकेंद्रात १२ जण कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:36 AM