ते पुढे म्हणाले, शहरातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरणासाठी आ. अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. शहरातील रस्त्यांसाठी पहिल्यांदाच एवढा मोठा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नागरिकांनी कधी पाहिले नसतील एवढे दर्जेदार रस्ते तयार करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र, या कामासाठी पालिका प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे.
माजी उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले, आ. बाबर यांनी विकासाची दिशा ठरविताना पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी केंद्रभूत मानल्या आहेत. शहराचा पाणीप्रश्नही सोडविला आहे. गेल्या काही काळात यांनी दोन-तीन रस्त्यांसाठी निधी आणला होता. परंतु, नगरपालिकेन सहकार्य केले नाही. आता एवढा मोठा निधी मंजूर झाल्यानंतर पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी आपले मन मोठे करून दर्जेदार रस्ते करून घेण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे.
चौकट
ट्रिपल लेयर काँक्रीट रस्ते
मुंबई व पुणे सारख्या शहरात अंतर्गत रस्ते ही ट्रिपल लेयर काँक्रीट असतात. तसे दर्जेदार रस्ते विटेकर नागरिकांना अनुभवायला मिळावेत. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर टेलिफोन कार्यालय ते खरेदी-विक्री संघ आणि यशवंतराव चव्हाण पुतळा ते संगम मेडीकलपर्यंतचा रस्ता कॉँक्रिटीकरण व आरसीसी गटार या निधीतून करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सुहास बाबर म्हणाले.