शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

Sangli: इस्लामपुरात सोन्याच्या बिस्किटाच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक, दुप्पट लाभ देण्याची बतावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 4:16 PM

‘मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर’ असे सांगत शिवीगाळही केली

इस्लामपूर : शहरातील किसाननगर परिसरात राहणाऱ्या महिलेस सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवत दीड महिन्यात दुप्पट लाभ मिळवून देण्याची बतावणी करत कल्याण-ठाणे येथील भामट्याने १२ लाख रुपयांचा गंडा घातला. ही घटना मागील वर्षीच्या जून, जुलै महिन्यात घडली असून, सातत्याने मागणी करूनही पैसे न मिळाल्याने पोलिसांत आता फिर्याद दाखल झाली आहे.याबाबत संगीता नीलेश पाटील (३९, किसाननगर, इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश उत्तम साबळे (आंबिवली, कल्याण-वेस्ट, ठाणे) या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगीता पाटील या गेल्या चार वर्षांपासून नेटवर्किंग मार्केटिंगचा व्यवसाय करतात. यातून राजेश साबळे हा त्यांच्या संपर्कात आला होता.मी कस्टम कार्यालयातून सोन्याची बिस्किटे घेऊन त्यावर जादा २० टक्के नफा मिळवत ती सराफ व्यापाऱ्यांना विकत असतो. महिन्यातून ४ ते ५ वेळा सोन्याच्या बिस्किटांची विक्री करतो. मुंबईतील बऱ्याच लोकांना दामदुप्पट पैसे मिळवून दिले आहेत, अशी बतावणी करत साबळे याने पाटील यांचा विश्वास संपादन केला. फायदा मिळालेल्या लोकांच्या व्हिडीओ क्लिपही दाखवल्या.संगीता पाटील यांचा साबळे याच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने त्यांनी गेल्या वर्षीच्या जून आणि जुलैमध्ये स्वत:जवळील आणि नातेवाईक, मित्रांकडून १२ लाख रुपये उसनवारीने जमा करून ते रोख आणि आरटीजीएसद्वारे साबळे याच्याकडे दिले. त्यानंतर दीड महिन्याने त्यांनी साबळे याच्याशी संपर्क केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. फोन घ्यायचे टाळू लागला. मात्र, तरीही पाटील यांनी पैशासाठीचा तगादा सोडला नव्हता.८ जून २०२३ ला साबळे याच्याशी संपर्क झाल्यावर ‘मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर’ असे सांगत साबळेने शिवीगाळही केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलिस उपनिरीक्षक गावडे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस