सांगली : जिल्हा प्रशासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा १२ हजार २९० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाच्या आराखड्यास गुरुवारी बैठकीत मंजुरी देण्यात आली. शेतकऱ्यांना पशुधन आणि मासेवारीकरिताही कर्ज वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख राजीवकुमार सिंग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, आरबीआयचे अग्रणी अधिकारी बिस्वजीत दास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली विवेक कुंभार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक नंदिनी घाणेकर, माविमचे व्यवस्थापक कुंदन शिनगारे, बीओंआय आरसेटीचे संचालक महेश पाटील आदी उपस्थित होते.
नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नीलेश चौधरी म्हणाले, वार्षिक पतपुरवठा आराखड्या अंतर्गत कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राचे एकूण प्राथमिक क्षेत्राचे उद्दिष्ट आठ हजार ७९० कोटींचे आहे. अप्राथमिक क्षेत्राकरिता तीन हजार ५०० कोटी असे एकूण उद्दिष्ट १२ हजार २९० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. २०२४-२५ करिता गाई-म्हैशी व मासेमारीकरिता कर्ज वाटप करण्याची सूचनाही त्यांनी बँकांना दिली आहे.
अत्यल्प कर्ज वाटप करणाऱ्यांना बँकांना नोटिसाडॉ. राजा दयानिधी म्हणाले, शेतकऱ्यांना पीक विमा व हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदण्याकरिता बँकांनी पीक विमा हप्ते विमा कंपनीकडे वेळेत वर्ग करावेत. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याकरिता बँका आणि विविध महामंडळांनी परस्पर समन्वय ठेवून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. कर्ज वाटपात अत्यल्प काम झालेल्या शासकीय विभाग, महामंडळे व बँकांना कामगिरी सुधारण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.