कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव, बोरगाव, बसप्पाचीवाडी, शिंदेवाडी, खरशिंग, शिरढोण, मळणगाव, जायगव्हाण, हिंगणगाव, देशिंग, ढोलेवाडी, मोरगाव, म्हैसाळ एम या गावांत पथदिवे, पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल न भरल्याने महावितरणने गावातील वीजपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईविरोधात १३ गावच्या सरपंचांनी एकत्रित येत तहसीलदार गोरे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, हे थकीत वीज बिल शासनाने भरावे. सध्या कोरोनामुळे ग्रामपंचायतीची वसुली पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे वीज बिल भरणे शक्य नाही. महावितरणने जे विजेचे खांब ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभे केले आहेत, त्याचे कर गेली ४० वर्षे दिलेले नाहीत. ते आधी भरावेत.
या निवेदनावर अरुण भोसले, अशोक मंडले, सुहास पाटील, संजय चव्हाण, गोरख पाटील, विष्णू मिरजे, शामराव इरळे, शहाजी एडके, राजाराम खरात, रमेश काशीद, बाळासाहेब जानकर, सहदेव परीट, दिगंबर गुरव यांच्या सह्या आहेत.