शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव जीप घुसली, २५ वारकरी जखमी; चाैघांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 7:39 PM

२५ वारकरी जखमी : चाैघांची प्रकृती गंभीर; दिंडी शाहूवाडी तालुक्यातील; चालक फरार

सांगली/कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे भरधाव पीकअप जीप वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात २५ वारकरी गंभीर जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना कवठेमहांकाळ व मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. काेल्हापुर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील ही दिंडी आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा अपघात घडला. अपघातानंतर पीकअपचालक घटनास्थळावरुन पसार झाला.

जखमींमध्ये अक्काताई बाळासाहेब पाटील (६९), अक्काताई अनिल कांबळे (५०), सुशांत सर्जेराव पाटील (२६), प्रकाश रामचंद्र जाधव (६०), सखुबाई शामराव पाटील (६०), बनाबाई पाटील (सर्व रा. शिवरे), सुरेश शिवाजी पाटील (५६), शिवराज बाबासाहेब चाैगुले (५९), शंकर गणपती पाटील (४२, सर्व माणगाव), राजाराम बाबा पाटील (५५, पाटणे), अक्काताई आनंदा नायकवडी (६०, रा. कारंदवाडी), हाैसाबाई नायकवडी (वय ७०), अक्काताई पाटील (५५), सुमन रंगराव कदम (४०), सुशीला सखाराम पालखे (४५), बाळाबाई कदम (४९), सुरेखा प्रकाश पाटील (५०), शंकर मारुती पाटील (४०), बाळु श्रीपती पाटील (४०), जाकाबाई नारायण जाधव (५०) यांच्यासह अन्य काही वारकऱ्यांचा समावेश आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहुवाडी तालुक्यातील पवार दिंडी आषाढी एकादशीसाठी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ हाेती. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पीकअप जीप (क्र. एमएच ०८ डब्लू ५७७१) मिरजहुन पंढरपूरकडे भरधाव वेगाने निघाली हाेती. केरेवाडीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने पीकअप भरकटली. समाेर असलेल्या माेटारीच्या (क्र. एमएच ०९ ईएम ६२०४) डाव्या बाजुला घासत तशीच पुढे जात वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली. वारकऱ्यांना काही कळण्यापुर्वीच जीप उलटल्याने पंचवीसहुन अधिक वारकरी जीपखाली सापडले. दिंडीत एकच गाेंधळ उडाला. वारकरी या अपघाताने भेदरून गेले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमींना तातडीने आपत्कालीन रुग्णवाहिकेतुन कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथुन प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. जखमींपैकी चाैघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. आषाढी वारीसाठी पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीस अपघात झाल्याचे समजताच पाेलिसांसह प्रशासकीय यंत्रणा तात्काळ अपघातस्थळी दाखल झाली. अपघाताची नाेंद कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्यामध्ये झाली असुन अधिक तपास सुरु आहे.दिंडी शाहुवाडी तालुक्यातीलअपघातग्रस्त दिंडी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहे. संत बाळूमामांच्या पादुका घेऊन ही दिंडी निघते. पवार दिंडी नावाने ती ओळखली जाते. शाहूवाडी तालुक्यातील आसपासच्या गावातील वारकरी दीडशेहुन अधिक वारकरी या दिंडीत सहभागी आहेत.

टॅग्स :Sangliसांगली