सांगली जिल्ह्यातील पुरबाधीत शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीसाठी 131 कोटी रुपये--जयंत पाटीलसांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यातअतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अतिवृष्टीत उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधितझालेल्या शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जस माफी जाहीर करण्यात आलीहोती.यासाठी आतापर्यंत जिल्ह्याला 131 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे . यातील 80कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारी 2020 मध्ये प्राप्त झाला असून आता 15एप्रिल 2020 रोजी उर्वरित50 कोटी 91 लाख निधी पीक कर्ज माफीसाठी प्राप्त झाला आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवरसरकारसमोर आर्थिक समस्या असली तरी पूरबाधित कोणीही शेतकरी या कर्जमाफी पासून वंचितराहू नये यासाठी अर्थमंत्री अजित पवार तसेच अर्थ सचिव यांच्याकडे वारंवार या रकमेसाठीपाठपुरावा करून सदरची रक्कम विशेष बाब म्हणून जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेण्यात यशआल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या पूरपरिस्थीतीतबाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या एक हेक्टर पर्यंच्या पीक कर्जास माफी देण्यात आली होती. सदरकर्जमाफीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील पूरबाधीत शेतकऱ्यांचा सांगली जिल्हा मध्यवर्तीसहकारी बँकेकडील 22 हजार 573 शेतकऱ्यांची व राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांची 5 हजार 873शेतकऱ्यांची अशी एकूण 28 हजार 446 शेतकऱ्यांचा कर्जमाफी रक्कमेचा मागणी प्रस्ताव शासनाससादर करण्यात आला होता.सदर प्रस्तावास अनुसरुन दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार 80कोटी रुपये इतका निधी प्राप्त झाला होता. हा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पूरबाधीतशेतकरी कर्जदारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. तसेच दिनांक 27 मार्च 2020 रोजीच्याशासन निर्णयान्वये 50 कोटी 91 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता. 15 एप्रिल 2020रोजी प्राप्त झाला आहे. यापैकी 25 कोटी रुपये इतकी रक्कम सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारीबँकेकडे पूरबाधीत कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी वर्ग करण्यात आले आहेत.उर्वरित 26 कोटी इतकी रक्कम राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांकडे लेखापरिक्षण होत असलेल्यायादीनुसार वर्ग करण्याबाबतीच कार्यवाही सुर आहे. असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनीसांगितले.