सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नव्याने १३७३ कोरोनाबाधित आढळले. १२३५ जणांनी कोरोनावर मात केली. २९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
मंगळवारअखेर उपचाराखालील रुग्णांची संख्या १७ हजार ७१ इतकी झाली. ७३ हजार ६८७ जण आजवर कोरोनामुक्त झाले आहेत, तर आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ९३ हजार ४६५ झाली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या २६४१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
दिवसभरात १०२५ नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली, त्यामध्ये नमुने पॉझिटिव्ह निघाले. रॅपिड ॲन्टिजनच्या ३७०८ चाचण्यांमधून १०९१ कोरोनाबाधित निष्पन्न झाले. मृत्यू झालेल्यांपैकी आटपाडी १, शिराळा १, खानापूर ३, तासगाव ४, जत ७, मिरज ३, वाळवा तालुक्यातील एक रुग्ण आहे. कडेगाव, पलूस कवठेमहांकाळमध्ये एकही मृत्यू झाला नाही. महापालिका क्षेत्रातील ८ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सांगली १, मिरज ५ व कुपवाडच्या दोन रुग्णांचा समावेश आहे. परराज्यातील ३८ जण कोरोनाबाधित आढळले, तर १० जणांचा मृत्यू झाला.
चौकट
मंगळवारचे तालुकानिहाय रुग्ण
आटपाडी ११५
कडेगाव ७८
खानापूर १०१
पलूस ९५
तासगाव १३७
जत २२०
कवठेमहांकाळ ५९
मिरज १८३
शिराळा ५९
वाळवा १५८
महापालिका क्षेत्र १६८
सांगली शहर १२९
मिरज शहर ३९