ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चांगले असून मूलभूत सुविधाही आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण असे शिक्षण देण्याचे धोरण आहे. टप्प्या-टप्प्याने जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा मॉडेल स्कूल करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये १३६ जिल्हा परिषद मराठी शाळा, एक उर्दू आणि एक कन्नड शाळा अशा १३८ जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल करण्यात येणार आहे. ई-लर्निंग, क्रीडांगण, संगणक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे धोरण आहे. यासाठी जिल्हा परिषद स्वीय निधीसह मनरेगा, लोकवर्गणी आदींच्या माध्यमातून शाळांचा विकास करणार आहे. शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लोकांनी आपल्या गावातील शाळेचा विकास करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही डुडी यांनी केले आहे.
चौकट
जिल्ह्यातील सर्वच शाळांत क्रीडाशिक्षक
जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळांमध्ये क्रीडाशिक्षक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये एका क्रीडा संस्थेकडून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतील एका शिक्षकास क्रीडाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर मनरेगाच्या निधीतून शाळेचे क्रीडांगण विकसित करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेत उत्कृष्ट खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.