सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाली असून, दिवसभरात १३९५ रुग्ण आढळून आले, तर कोरोनाने जिल्ह्यातील २४ व जिल्ह्याबाहेरील १३ अशा ३७ जणांचा बळी घेतला. खानापूर तालुक्यात सर्वाधिक २४६ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ८९४ जणांनी कोरोनावर मात केली. १९९० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मंगळवारी आटपाडी तालुक्यात ११०, जत १०६, कडेगाव ८४, कवठेमहांकाळ ६९, खानापूर २४६, मिरज १४२, पलूस ६०, शिराळा १०१, तासगाव ८८, वाळवा १७३, तर महापालिका क्षेत्रात सांगलीत १२६, मिरजेत ९० असे २१६ रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ६२ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात आटपाडी. कडेगाव, पलूस, मिरज तालुक्यातील प्रत्येकी १, जत, खानापूर, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी तीन, वाळवा तालुक्यातील पाच तर महापालिका क्षेत्रात सांगलीतील दोन, मिरजेतील एक व कुपवाडमधील तीन अशा २४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील १३ जणांचाही कोरोनाने बळी घेतला.
सध्या १९९० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर जिल्ह्यातील ८७० व जिल्ह्याबाहेरील २४ अशा ८९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या २३४८ चाचण्यात ७१४ पाॅझिटिव्ह तर अँटिजेनच्या ३११२ चाचण्यात ७४३ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : ७१,७२७
कोरोनामुक्त झालेले : ५७,५१५
आतापर्यंतचे मृत्यू : २१६७
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : १२६
मिरज : ९०
आटपाडी : ११०
जत : १०६
कडेगाव : ८४
कवठेमहांकाळ : ६९
खानापूर : २४६
मिरज : १४२
पलूस : ६०
शिराळा : १०१
तासगाव : ८८
वाळवा : १७३