कामेरी : कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी १६ कोरोनाबाधित सापडले. यात गाताडवाडी नऊ, कामेरीतील पाच व इस्लामपूरच्या दोन जणांचा समावेश आहे. ३० अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यापैकी १६ बाधित तर १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.
गेल्या आठवड्यापासून बाधित होणारे रुग्ण एकाच कुटुंबातील २ ते ५ पर्यंत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी बाधित १६ रुग्ण ५ कुटुंबांतील आहेत. यावरून होम आयसोलेशनबाबत बाधित रुग्णाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने ४ दिवसांत कुटुंबातील इतर सदस्यही बाधित होत असल्याने आढळून येत आहे.
एकच समाधानकारक बाब म्हणजे बाधितांची संख्या वाढत असली तर मृत्यूदर २.२५ टक्के आहे. आता १ फेब्रुवारी पासून ८ जूनअखेर दुसऱ्या लाटेत कामेरीतील बाधितांची एकूण संख्या ४०० झाली आहे. ६० जण उपचार घेत आहेत. येडेनिपाणी १३६ पैकी ४६, विठ्ठलवाडी ६७ पैकी २५, गाताडवाडी ४४ पैकी १५, शिवपुरी १४ पैकी २ बाधितांवर होम आयसोलेशन व ग्रामपंचायतीच्या कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.