कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचारप्रकरणी समाजकल्याण विभागाने शाळेतील १४ शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. दरम्यान, या शाळेची मान्यता रद्द करण्याबाबतही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील शाळेसह शिक्षकांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.
मिनाई आश्रमशाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी शुक्रवारी सलग तिसºया दिवशी गावातील वातावरण तणावपूर्ण होते. आश्रमशाळेस पुणे येथील भटक्या विमुक्त जाती-जमाती इतर मागासवर्ग कल्याण संचालनालयाचे संचालक एस. एन. अहिरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी समाजकल्याणचे सहआयुक्त सचिन कवले यांना, संस्था रद्दबाबत व कर्मचारी निलंबनाबाबत शासनास फेरप्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या.
आश्रमशाळेस भेट देणाºया अधिकाºयांना संस्थापक अरविंद पवार हा आर्थिक बळावर थोपवत असल्याचे दिसून आले. शाळेस भेट दिलेल्या अधिकाºयांनी शेरेबुकात नोंद करताना, शालेय वातावरण चांगले असल्याची, तसेच वसतिगृहातील मुला-मुलींची वैद्यकीय तपासणी केल्याची खोटी नोंद केली आहे. जर या अधिकाºयांनी खरी वस्तुस्थिती मांडली असती, तर मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण त्याचवेळी समोर आले असते. मात्र तसे न झाल्याने पैशाच्या जोरावर नराधम पवार याने सर्वच अधिकाºयांना गप्प केल्याचे समोर आले आहे.
आश्रमशाळेतील घडलेल्या लैंगिक प्रकाराविषयी माहिती घेण्यासाठी आलेले संचालक अहिरे यांच्यासमोर प्रत्येक शिक्षकाने नराधम अरविंद पवार याच्या दंडुकेशाहीचा पाढा वाचला. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाºयांमध्ये त्याच्या असणाºया दहशतीविषयी माहिती देत ते रडू लागले. दरम्यान, त्याचवेळी एका शिक्षिकेला रडता-रडता चक्कर आल्याने सर्वांची पळापळ झाली. त्यानंतर शिक्षकांनी मांडलेली ही वस्तुस्थिती शासनास पाठविण्याची सूचना संचालक अहिरे यांनी समाजकल्याण आयुक्त कवले यांना केली.
दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करीत असताना त्यांनी उपविभागीय अधिकारी किशोर काळे, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना योग्य तपास करण्याच्या सूचना दिल्या.
‘समाजकल्याण’ची खरडपट्टीबाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अॅड. स्वरदा केळकर यांनी शुक्रवारी कुरळप येथील आश्रमशाळेस भेट दिली. आश्रमशाळेत अनुचित प्रकाराबद्दल केळकर यांनी सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांना नोटीस काढून खरडपट्टी केली. आयोगाच्यावतीने अधिक्षक व संस्थेला नोटीसाही बजाविल्या. या प्रकरणातील दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, इस्लामपूर माजी नगरसेवक विजय कुंभार, व्ही .टी. पाटील, सतीश पाटील, संजय जाधव उपस्थित होते.