सांगली : मिरज तालुक्यातील नांद्रे येथे दर्ग्यामध्ये दर्शनासाठी गेलेल्या महिलेची १४ हजारांची रोकड लांबविण्यात आली. पर्समध्ये ठेवलेली ही रक्कम चोरट्यांनी चोरली. याप्रकरणी सुनीता झकास भोसले (वय ४०, रा. वसगडे) यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवारी दुपारी दोनच्यासुमारास ही घटना घडली. सुनीता झकास भोसले (वय ४०, रा. वसगडे ता. पलूस) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बँक कामासाठी भोसले गुरुवारी नांद्रेमध्ये आल्या होत्या. बँकेत जाण्यापूर्वी त्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीत अज्ञाताने त्यांच्या पर्समधील १४ हजारांची रोकड लंपास केली. दर्शनानंतर त्या बँकेत गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.