शिराळा : शिराळा
तालुक्यात शनिवारी ३६ गावांमध्ये विक्रमी १४१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुन्हा तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शिराळा शहरासह सागाव, मांगले ही गावे हॉटस्पॉट बनली आहेत. नागरिकांच्या बेफिकीरपणामुळे रुग्णसंख्या वाढत आहे.
शनिवारी सागाव १८, मांगले १५, निगडी, डिगे शिराळा प्रत्येकी ८, देववाडी, शिराळा, तडवळे,
सावर्डे प्रत्येकी ७, चरण, पाडळी प्रत्येकी ६, अंत्री बुद्रुक, वारणावती प्रत्येकी ५, पणुंब्रे वारुण ४, भागाईवाडी, चिखलवाडी, जांभळेवाडी, लादेवाडी प्रत्येकी ३, भाटशिरगाव, बिळाशी, बिऊर, चिखली, चिंचोली, खुजगाव, येळापूर प्रत्येकी २, आरळा, फकिरवाडी, गिरजवडे, हत्तेगाव, इंगरुळ, करमाळे, मणदूर, नाठवडे, पाडळेवाडी, वीरवाडी, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी १ असे १४१ रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात ६८९ रुग्ण उपचार घेत असून यामध्ये विलगीकरण कक्षात ८, उपजिल्हा रुग्णालय ५९, कोकरुड ग्रामीण रुग्णालय २४, स्वस्तिक कोरोना सेंटर २३, गृह विलगीकरणात ५७५ रुग्ण आहेत.