सांगली : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ३.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक १४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ०.४ (१२९. ७), तासगाव २ (१३७.९), कवठेमहांकाळ १.६ (२०७.३), वाळवा-इस्लामपूर ५.५ (१६८.८), शिराळा १४.८ (३७५.६), कडेगाव ४.२(१५९.४), पलूस ३ (१२४.४), खानापूर-विटा २ (२३९.०), आटपाडी ०.० (१५३.३), जत ०.०(७९.८).
वारणा धरणात 15.44 टी.एम.सी. पाणीसाठाजिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 15.44 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 34.37 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 5.74 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 2.65 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 5.41 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 1.94 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 11.30 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 3.28 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 73.41 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये पुढीलप्रमाणे.
कोयना 2111, वारणा 569, कण्हेर 24, राधानगरी 1100, कासारी 250, उरमोडी 300, तारळी 370, अलमट्टी 1130.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे.
कृष्णा पूल कराड 6.6 (45), आयर्विन पूल सांगली 7.9(40) व अंकली पूल हरिपूर 7.7 (45.11).