जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी ग्रामपंचायत निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता सूचना केल्या आहेत. त्यानुसार पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंधळी, मोराळे, रामानंदनगर, नागराळे या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगार हैबती गुंडा पाटील, शीतल अनिल गाडे, मालन तुकाराम शिरतोडे, पंढरीनाथ रघुनाथ गुजले, रघुनाथ तुकाराम शिरतोडे (रा. मोराळे), अनिल प्रल्हाद माने (रा. आंधळी), इसाक महसीन पिरजादे, विक्रम सुरेश मदने, संजय शंकर जाधव, शीतल मनोहर माळी, संजय शामराव मदने (रा. रामानंदनगर), संजय लक्ष्मण मस्के, विनोद विकास दुधाणे (रा. नागराळे), सुनील मनोहर माळी (रा. बांबवडे) यांना ग्रामपंचायत निवडणुका प्रक्रिया पार पडेपर्यंत पलूस तालुक्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार उपविभागीय दंडाधिकारी कडेगांव यांच्याकडे दिला हाेता. त्यानुसार त्यांना १२ ते १६ जानेवारी या कालावधीत तडीपार केले आहे. त्यांना निवडणुकीच्या
दिवशी दि. १५ जानेवारीला सकाळी ८ ते ११ या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्याकरीता प्रवेशास परवानगी देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.