शिवांजली, ऐश्वर्यासह १५ भारतीय विद्यार्थी हंगेरी बॉर्डरकडे रवाना, खारकिव्हमधून सुरक्षित बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:43 PM2022-03-02T14:43:34+5:302022-03-02T14:44:04+5:30
प्रताप महाडीक कडेगाव : युक्रेनमध्ये अडकलेल्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनिल ...
प्रताप महाडीक
कडेगाव : युक्रेनमध्ये अडकलेल्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनिल पाटील यांच्यासह १५ भारतीय विद्यार्थी खारकिव्ह पासून जवळपास १६५० किमी अंतरावर असलेल्या हंगेरी बोर्डरकडे ट्रेनने रवाना झाले आहेत. राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम हे सातत्याने या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.
सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शिवांजली व ऐश्वर्या यांच्याशी संवाद साधला.या संवादातून शिवांजली व ऐश्वर्या या दोघींसह १५ विद्यार्थी हंगेरी बोर्डरकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले होते. यावेळी त्या दोघींसह अन्य १५ भारतीय विद्यार्थी रुमनिया बोर्डरकडे रवाना झाल्याचे समजले.
यावेळी शिवांजली म्हणाली आम्ही राहत होतो. बंकर्स मधील अन्नसाठा संपत आला आहे.रशियाकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत.त्यामुळे तेथे राहणे धोक्याचे होते . यामुळे आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर बाहेर पडलो आणि ट्रेनच्या माध्यमातून १५ तास प्रवासाच्या अंतरावर असलेल्या हंगेरी बॉर्डरकडे रवाना झालो आहे.
डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतीय दूतावासकडून प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकार आणि राज्य सरकारचे स्थितीकडे लक्ष आहे.स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्या, राहण्याची जेवणाची व्यवस्था पहा आणि युद्धजन्य भागातून दूर राहण्याचा प्रयत्न करा. असे सांगून या मुलांना राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिलासा दिला.
दरम्यान आज दुपारी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी कडेपुर येथील शिवांजली व हिंगणगाव (खुर्द) येथील ऐश्वर्या यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधला व दिलासा दिला.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी साधला संपर्क
सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी संपर्क साधून शिवांजली व ऐश्वर्या यांच्यासह युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलांना सुरक्षित भारतात आणण्याबाबत विनंती केली. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही याबाबत गांभीर्याने दखल घेऊन या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याची ग्वाही दिली.