सांगली: बेदाण्याची खरेदी करून पैसे परत न केल्याबद्दल हैदराबाद येथील व्यापाºयाविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजिज उमर मुल्ला (वय ४३, रा. मंगलमूर्ती कॉलनी) यांनी व्यापाºयाने १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे.
याप्रकरणी दीपक बंकटलाल पिवारी (रा. बेगमबाजार, हैदराबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीज मुल्ला यांची एस. ए. मसाला या नावाने कंपनी आहे. त्यांनी दि. ७ मे २०१८ ते ६ आॅगस्ट २०१८ दरम्यान हैदराबाद येथील पिवारीच्या श्री बालाजी ट्रेडिंग कंपनीला ४५ लाख ७२ हजार २६५ रुपयांचा बेदाणा खरेदी करुन दिला. त्याबदल्यात पिवारी याने ३१ लाख १ हजार ९२० रुपये मुल्ला यांच्या बँक खात्यावर जमा केले.मात्र, उर्वरित १४ लाख ७० हजार ३४५ रुपये मागणी करुनही पिवारीने दिले नाहीत.
रक्कम देण्यास त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर मुल्ला यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिवारी याच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.