सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची विक्रमी वाढ मंगळवारीही कायम होती. दिवसभरात १,५७५ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर परजिल्ह्यातील १६ जणांसह जिल्ह्यातील ४१ अशा ५७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने ८० हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे. दिवसात १,२९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दीड हजारांवर नवे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी पुन्हा एकदा उच्चांकी संख्येने बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात ४१ जणांचा मृत्यू झाला असून, यात सांगली ९, मिरज २ यासह तासगाव आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी ६, खानापूर ४, कडेगाव ३, वाळवा, जत, पलूस तालुक्यातील प्रत्येकी २ तर आटपाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहे. खानापूर तालुक्यात २३८ रुग्ण आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४ हजारांवर पोहोचली असून, त्यातील २,४५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २,२२२ जण ऑक्सिजनवर, तर २२८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी आरटीपीसीआर अंतर्गत २,३२२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ८०८ जणांना कोरोना निदान झाले, तर रॅपिड अँटिजनच्या ३,४५७ जणांच्या तपासणीतून ८२५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
परजिल्ह्यातील ५८ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत, तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ८१,४८६
उपचार घेत असलेेले १४,१०२
कोरोनामुक्त झालेेले ६४,९५५
आतापर्यंतचे एकूण बाधित २,४२९
मंगळवारी दिवसभरात
सांगली ८५
मिरज ८२
खानापूर २३८
वाळवा २१९
जत २०३
आटपाडी १६७
कवठेमहांकाळ १३५
कडेगाव ११५
तासगाव १०४
मिरज तालुका १०१
पलूस ६४
शिराळा ६२
चौकट
बाधीत ८० हजारांवर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने मंगळवारी ८० हजारांचा टप्पा पूर्ण केला. यातील ६४,९५५ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. गेल्या महिन्यापर्यंत स्थिर असलेल्या बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.