सांगली : क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी दिलेले चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यासाठी शासन त्यांना १६ कोटी रुपये देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वाळवा येथे केली.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे आणि राज्यस्तरीय किशोर-किशोरी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार शेतकºयांच्याही पाठीशी आहे. ऊसदराचा ७०-३० फॉर्म्युला देशात केवळ महाराष्टÑानेच अवलंबिला. त्यामुळे कारखान्याच्या एकूण उत्पन्नाच्या ७० टक्के रक्कम शेतकºयांच्या पदरात पडत आहे. ज्या वेळी साखरेला दर नव्हते, त्या वेळी कारखान्यांना मदतीची भूमिकाही सरकारने घेतली. हुतात्मा कारखान्याने तर केवळ ऊस गाळपातून देशात उच्चांकी दर दिला. या कारखान्याचा आदर्श अन्य कारखान्यांनी घ्यावा. संस्था उभ्या करून त्यावरील अधिकार सोडण्याचा मोठेपणा नागनाथअण्णांकडे होता.वैभव नायकवडींना भाजपा प्रवेशाची आॅफरक्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडींचे पुत्र, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट भाजपा प्रवेशची ‘आॅफर’ दिली. वाळव्याच्या क्रांतिभूमीत नागनाथअण्णांच्या संस्थांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य समजतोे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागनाथअण्णांच्या स्मारकाला १६ कोटी, हुतात्मा संकुलाला पूर्ण ताकदीने मदत करणार - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 2:57 AM