शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जिल्ह्यातील १६ हजारांवर शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:55 PM

सांगली : जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या १९ हजार ७७४ शेतकºयांपैकी १६ हजार ६०३ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारअखेर ६५ कोटी ४६ लाख रुपये वर्ग झाले. अंतिम टप्प्यात २ हजार ४६ शेतकरी तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरल्याने त्यांचे ६ कोटी ३४ लाख रुपये शासनाकडे परत जाणार आहेत. किरकोळ त्रुटी असलेल्या अन्य शेतकºयांचे पैसे दोन ...

सांगली : जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या १९ हजार ७७४ शेतकºयांपैकी १६ हजार ६०३ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारअखेर ६५ कोटी ४६ लाख रुपये वर्ग झाले. अंतिम टप्प्यात २ हजार ४६ शेतकरी तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरल्याने त्यांचे ६ कोटी ३४ लाख रुपये शासनाकडे परत जाणार आहेत. किरकोळ त्रुटी असलेल्या अन्य शेतकºयांचे पैसे दोन दिवसात वर्ग होण्याची चिन्हे आहेत.कर्जमाफीच्या शेवटच्या टप्प्यातही काही त्रुटींचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे. त्यामुळेच बुधवारी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. जिल्ह्यातील ४० हजार ८५९ शेतकºयांना एकूण १०८ कोटी ५८ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा व अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यासंदर्भातील ‘ग्रीन लिस्ट’ जाहीर झाली असून, प्रत्यक्ष खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सहकार विभागामार्फत सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसात ६५ कोटी ४६ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. अजूनही तीन हजार १७१ शेतकरी त्रुटींअभावी कर्जमाफीच्या कक्षेपासून दूर आहेत. यातील २0४६ शेतकरी पूर्णत: अपात्र ठरल्याने त्यांची यादी व ६ कोटी ३४ लाख रुपये शासनाकडे परत पाठविण्यात येणार आहेत. किरकोळ त्रुटी असलेल्या काही शेतकºयांच्या रकमा दोन दिवसात वर्ग होण्याची शक्यता आहे. नियमित कर्ज भरणाºया जिल्ह्यातील २१ हजार ८५ शेतकºयांना ३६ लाख ३८ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान वर्ग होत आहे. प्रोत्साहन अनुदानाचे पैसे थेट शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही स्तरावर आता कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात आली आहे.दीड लाखांपर्यंत कर्ज असणाºया १९ हजार शेतकºयांचा सात-बारा कोरा होणार असून, त्यांना एकूण ७२ कोटी 0४ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. दीड लाखांच्या आतील शेतकºयांची मंजूर झालेली रक्कम खात्यांवर वर्ग होत असून, सात-बारा कोरे होत आहेत.आजपासून मोबाईलवर मेसेजकर्जमुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता गुरुवारपासून पात्र प्रत्येक शेतकºयाच्या मोबाईलवर कर्जमुक्तीचे संदेश जाण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात ही प्रक्रिया संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अपात्र यादीची फेरपडताळणी शासनाकडून होऊन परत येण्याचीही शक्यता आहे.तालुकानिहाय कर्जमाफी (कोटीत)तालुका शेतकरी कर्जमाफीआटपाडी ७५६ ३,२५९५६८८जत ४६६८ १९,८0,६४,२८४क. महांकाळ २0१६ ५,११,८४,८८६कडेगाव ६४२ २,५0,२८,0३२खानापूर १0८१ ३,३६,८२१६८मिरज २३७५ ८,९७,४७,१८३पलूस १२२0 ४,३३,२६,४00शिराळा ४६२ १,३८,२८,७४७तासगाव ४८0३ १८,५६,२७,१७७वाळवा १७५१ ४,७३,३५,९३३एकूण १९७७४ ७२,0४,२0,५0२

टॅग्स :Farmerशेतकरी