केवळ सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या भागात एकूण रुग्णसंख्या १६६ झाली आहे. यामध्ये खासगी रुग्णालयांत आठ, तर होम आयसोलेशनमध्ये ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. १११ जणांनी कोरोनावर मात केली. नऊजणांचा मृत्यू झाला आहे. गावातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून दि. ८ ते १५ मे हे आठ दिवस बँकेच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांबरोबर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, अत्यावश्यक सेवेतील दुकानचालकांना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. औषध फवारणी, गावातील प्रमुख रस्ते बंद करून बाहेरून येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांसह इतर फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली आहे. अशा अनेक उपाययोजना करूनही ग्रामस्थांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
चौकट
विलगीकरण कक्षात दाखल व्हा
कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहत असल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. यासाठी टाकळी ग्रामपंचायत व टाकळीतील काही संस्थांच्या सहकार्याने कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे. रुग्णाने होम आयसोलेशनमध्ये न राहता विलगीकरण कक्षात येऊन राहावे, असे आवाहन सरपंच महेश मोहिते, ऑगस्ट कोरे व पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांनी केले आहे.