सांगली : रेव्हिन्यू कॉलनी, सांगली येथील कोरोना बाधित रुग्णाच्या निकट संपर्कात असलेल्या बाधित २१ जणांचा स्वाब कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी १७ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरित ४ जणांचा अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.सांगली जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोना बाधित झाले असून यामध्ये मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला तसेच सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिला यांचा समावेश आहे, तर अंकले ता. जत येथील कोरोना बाधित ठरलेल्या रुग्णाचा सहकारीही कोरोना बाधित झाला आहे.
जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ४४ झाली असून जिल्ह्यात सक्रीय कोरोनाचा आकडा १२ वर पोचला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ सुरू केले असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे. या ठिकाणी वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.