शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

तासगावच्या बाह्य वळण रस्त्यासाठी १७३ कोटी रूपये मंजूर - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 12:06 PM

दहिवडी ते विटा राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन

विटा : तासगाव शहरासाठी बाह्य वळण (रिंग रोड) रस्त्याबाबत तेथील स्थानिक आमदारांनी अनेकवेळा माझी भेट घेतली होती. त्यानंतर आता तासगावच्या बाह्य वळणच्या ७ किलोमीटर (रिंगरोड) रस्त्यासाठी १७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भूसंपादनाचे काम सुरू आहे. लोकांनी सहकार्य केल्यास लवकरच या रिंगरोडचे काम पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.विटा येथे शुक्रवारी दहिवडी, मायणी ते विटा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० चे भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री गडकरी बोलत होते. पालकमंत्री सुरेश खाडे, खा. विशाल पाटील, दिलीप येळगावकर, सुहास बाबर, राजाराम गरूड, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.मंत्री गडकरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात एकंदरीत महामार्गाची लांबी पूर्वी ३६ कि. मी. होती. ती आता ६०० कि.मी.पर्यंत पोहोचली आहे. विशेषत: जिल्ह्यातील मागास भागाचा फायदा होईल. मुंबई ते पुणे व बेंगलोर या नवीन द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाची बांधणी करणार आहे. मुंबईहून निघताना अटल सेतूवरून उतरल्याबरोबर मुंबई ते पुणे महामार्गाला समांतर असा हा द्रुतगती महामार्ग बांधत आहोत. हा महामार्ग पुणे येथील बाह्य वळण रस्त्याला येऊन तेथून नवीन पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग तयार होणार आहे.मुंबईच्या जेएनपीटी चौक ते शिवरे या भागाचा डीपीआर पूर्ण झाला आहे. महिनाभरात १० हजार कोटी रुपयांचे पहिले काम सुरू होणार आहे. उर्वरित ५० हजार कोटींचे काम पुढील ६ महिन्यांत पूर्ण करणार आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला याचा फायदा होणार आहे.

टेंभूसह ताकारी, म्हैसाळला मीच निधी दिलामी जलसंधारण मंत्री असताना या भागातील म्हैसाळ, टेंभू, ताकारी योजना मंजूर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आज सर्व ठिकाणी हिरवेगार शिवार दिसत आहे. पाण्यामुळे जशी प्रगती झाली तसा या राष्ट्रीय महामार्गामुळे या भागाचा विकास होईल, असा आशावाद नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :SangliसांगलीNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग