आटपाडी शहरात तर ५५ नवे रुग्ण सापडल्याने शहरासह तालुक्याची कोरोनाचा हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यात आंबेवाडी आणि आवळाई येथे प्रत्येकी १३, दिघंची १२, विठलापूर ८, घाणंद, लेंगरेवाडी, लेंगरेवाडी, माडगुळे येथे प्रत्येकी दोन, पुजारवाडी (दिघंची), पुजारवाडी (आटपाडी), झरे, खरसुंडी, बाळेवाडी, बोंबेवाडी, खांजोडवाडी या गावात प्रत्येकी तीन रुग्ण आढळले, तर अनुसेवाडी, भिंगेवाडी, देशमुखवाडी, दडसवाडी, घरनिकी, कटफळ, खवासपूर, लोटेवाडी, मासाळवाडी आणि मुंढेवाडी या गावांमध्ये प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.
चौकट
सर्वाधिक रुग्ण आटपाडीत
आटपाडीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आटपाडीत रविवारी १७ रुग्ण होते, तर सोमवारी ५५ झाले. संचारबंदी असूनही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. शिवाय ज्यांच्या घरात कोरोना रुग्ण आहे, त्या कुटुंबातील उर्वरित मंडळी गावात फिरत आहेत. आटपाडीच्या अनेक भागांत नवे रुग्ण आढळत आहेत. अगदी वस्त्यांवरही कोरोना पोहोचला आहे. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत पुरेशी वैद्यकीय व्यवस्था नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे.